बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा वाढत असून फेब्रुवारी महिन्यात यात मोठी वाढ झालेली आहे, आज सकाळी वैद्यकीय सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधीत 416 नवे रुग्ण आढळून आले आहे. बुलडाणा जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतो की काय अशी भिती आता वाटायला लागली आहे, मात्र ही वेळ घाबरून जाण्याची नाही तर कोरोना या अदृष्य शत्रूशी लढण्याची आहे, ही लढाई कठीण नाही, फक्त प्रत्येकाने ‘मी जबाबदार’ अशी खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. गेल्या आठवडाभरापासून बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होताना दिसत असून आता खबरदारी घ्यावी लागेल.
बुलडाणा जिल्ह्यातील आजची स्थिती
आज बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 416 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून जळगाव जामोद मध्ये कोरोनाचा 147 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे हा तालुका हॉटस्पॉट ठरतो की काय अशी भीती व्यक्त होत आहे तसेच
▪️बलडाणा: 69 ▪️खामगाव: 07
▪️शेगाव : 43 ▪️दे. राजा : 39
▪️चिखली : 49 ▪️मेहकर : 01
▪️मलकापूर: 00▪️नांदुरा : 02
▪️लोणार : 34▪️मोताळा : 11
▪️सि. राजा : 08▪️संग्रामपूर : 00
▪️सिद्धिविनायक सेंटर : 06
आज जिल्ह्यात 2057 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 416 रुग्ण पॉझिटिव्ह (positive) आले आहेत . त्यामूळे Positivity rate 20.22 % एवढा आहे.
(टीप: ही आकडेवारी 22 फेब्रुवारी रात्री 12 वाजताची आहे)