लॉकडाऊन चे पूर्व संधेला शहर पोलिसांची मोठी कारवाई
खामगाव : अवैध देशी दारूचे १० बॉक्स व कारसह ३ लाख २४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त, एका आरोपीस अटक
खामगांव – लॉकडाऊन चे पूर्व संधेला शहर पोलिसांची मोठी कारवाई करत अवैध देशी दारूचे १० बॉक्स व कारसह ३ लाख २४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीस अटक केली आहे.
खामगांव शहरात कोवीड- 19 च्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी सा. बुलडाणा यांनी दिलेल्या आदेशानुसार मार्केट भागामध्ये गस्त सुरु असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की. एक इसम त्याचे ताब्यातील कारमध्ये एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी देशी दारु घेवून जाणार आहे. माहितीच्या आधारे कारचा शोध घेतला असता आठवडी बाजार खामगांव येथे केशरी रंगाची टाटा टियागो क्रमांक MH 28 AN 2139 मिळुन आली. सदर कारच्या चालकाने त्याचे नांव भागवत देविदस जगदाळे वय
29 वर्ष रा. नांदुरा असे सांगीतले. कारची झडती घेतली असता कारमध्ये देशी दारु टँगो पंच कंपनीचे 180 ml चे 10 बॉक्स किंमती 24,960/- रुपयेचा मुद्येमाल मिलुन आला. सदर कारवाईमध्ये कारसह एकुण 3.24,900/- रुपये चा मुद्दोमाल
जप्त करण्यात आला असुन महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. अरविंद चावरिया पोलीस अधिक्षक बुलडाणा, मा. श्री. हेमराजसिंह राजपूत अपर पोलीस अधिक्षक खामगांव, मा. श्री. अमोल कोळी उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. सुनिल अंबुलकर पोलीस निरीक्षक, नापोकॉ832 संतोष वाघ, नापोकाँ741 राजेंद्र
टेकाळे, पोकॉ/523 दिपक राठोड, पोकॉ878 प्रफुल टेकाळे पो.स्टे. खामगांव शहर यांनी केली आहे.