Home खामगाव विशेष शेगाव न प उपाध्यक्षा पदी आयु सुषमा नितिन शेगोकार

शेगाव न प उपाध्यक्षा पदी आयु सुषमा नितिन शेगोकार

शेगाव : येथील नगर परिषद उपाध्यक्षा म्हणून भाजपाच्या सौ सुषमा नितिन शेगोकार यांची बहुमताने निवड झाली.
ठरल्याप्रमाणे सौ ज्योतीताई संजय कलोरे यांनी राजीनामा दिला.त्यानुसार निवडणूक प्रक्रिया होवून भाजपाच्या सौ सुषमा नितिन शेगोकार यांच्या बाजूने 19 तर काॅग्रेस उमेदवार शे नईम यांना 7 मते मिळाली.एमआयएम चे वसीम पटेल तटस्थ राहिले.पीठासीन अधिकारी म्हणून सौ शकुंतलाबाई बुच यांनी तर सहाय्यक म्हणून प्रशासन अधिकारी ठाकरे यांनी काम पाहिले.
भाजपा गटनेते शरदसेठ अग्रवाल, पांडुरंग बुच, विजयबाप्पू देशमुख, प्रदिप सांगळे,गजानन जवंजाळ,दिपक ढमाळ, पाणी पुरवठा सभापती पवन महाराज शर्मा, आरोग्य सभापती सौ मंगलाताई कमलाकर चव्हाण, बांधकाम सभापती राजेंद्र कलोरे,महिला बाल कल्याण सभापती सौ मंगलाताई देशमुख,शिक्षण सभापती शैलेष डाबेराव,सौ वर्षाताई ढमाळ, ज्योतीताई चांडक,रत्नमाला ठवे,रजनीताई पहूरकर,ज्योतीताई कचरे,
माजी न प उपाध्यक्ष नारायण शेगोकार, माजी सैनिक भास्कर शेगोकार, आशा सुरवाडे,उषा संजय सोनोने,जयदेव सिरसाट, बाळासाहेब सिरसाट,आतिष सुरवाडे आदींनी नवनिर्वाचित उपाध्यक्षा सुषमा नितिन शेगोकार यांचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here