Home Breaking News श्रद्धा असावी तर अशी, ‘इतक्या’ भाविकांनी टेकला ‘श्रीं’च्या चरणी माथा

श्रद्धा असावी तर अशी, ‘इतक्या’ भाविकांनी टेकला ‘श्रीं’च्या चरणी माथा

 

शेगाव- कोरोना परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर नोव्हेंबर मध्ये श्री संत गजानन महाराज मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले, यात काळात ई पास पध्दतीने जवळपास
४ लक्ष लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दरम्यान आता पुढील आदेशा प्रर्यत मंदीर बंद राहील.

वाढत्या कोरोनाचा प्रदूर्भाव लक्षात घेता विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेले शेगावचे श्री संत गजानन महाराज यांचे मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. आजपासून (22 फेब्रुवारी) पुढील आदेशा येईपर्यंत मंदिर पूर्णतः बंद करण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर केला.

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. हे संक्रमण कमी करण्यासाठी शासन अनेक उपाय करत आहे. त्यामुळे ज्या नियमांना शिथिल करण्यात आले होते, त्या नियमांची पूर्वीप्रमाणे कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात संचारबंदी लावली असून, बाजार पेठेतील दुकाने व आस्थापना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. राज्यातील सर्व मंदिरांमध्ये दर्शनासाठी नियम शिथिल करण्यात आले होते. त्यानुसार शेगावचे मंदिरदेखील दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. ऑनलाइन ई-पास काढून आतापर्यंत लाखो भाविकांनी दर्शन घेतले.
कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असल्याने श्री संत गजानन महाराज मंदिर उघडे ठेवणे शक्य नाही. त्यामुळे अमरावती आयुक्त आणि बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर बंद ठेवण्याचा सूचना मंदिर प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार मंदिर प्रशासनाने मंदिर बंद केले आहे.

नोव्हेंबर मध्ये उघडले होते मंदिर राज्यासह देश विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत गजानन महाराज यांचे समाधीस्थळ विदर्भ पंढरी म्हणून ओळखले जाते. कोरोना काळात मंदिर बंद होते, त्यानंतर सरकारने परवानगी दिल्यावर १७ नोव्हेंबर २०२० रोजी मंदिर उघडण्यात आले, या नंतर अत्यंत शिस्तबद्ध, सर्व नियम पाळत, ई पास पध्दतीने भाविकांना दर्शनाचा लाभ मिळाला, महाप्रसाद सुद्धा सुरू करण्यात आला होता. श्री संत गजानन महाराज मंदिर सेवा, शिस्त आणि स्वच्छता यासाठी देशभर ओळखले जाते, कोरोना काळात त्याची प्रचिती आली. १७ नोव्हेंबर ते २२ फेब्रुवारी या काळात ४ लाखावर भाविकांनी श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here