मलकापुर:-बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील ग्राम बोराखेडी पोलिसांनी मोठी कारवाई करत आज पहाटे ३ वाजेदरम्यान पेट्रोलींग दरम्यान पोत्यात कुटार भरुन रचलेल्या थप्पीच्या आत 50 पेक्षा जास्त गायींनी भरलेल्या कंटेनर क्रमांक आर.जे.09 जि.सी.5223 ला ताब्यात घेतले आहेत.तर कंटेनर मधील गायींची सुटका करीत कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या प्रकरणी पोलीसांनी किती लोकांना अटक केली आहे याचा खुलासा झालेला नाही.पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.
कंटेनरमधील सर्व गायी पोलीसांनी ताब्यात घेत पुढील देखभालीसाठी मलकापूरच्या बेलाड येथील श्री हरि गौशाला येथे सोडण्यात आल्या आहेत.जेथे पुढील आदेशापर्यंत या सर्व गायींची काळजी घेतली जाईल.या घटनेत अनेक गायी जखमी आणि आजारी आहेत त्यांचेवर उपचाराची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.तर काही गायींचा मृत्यु झाला आहे.याप्रकरणी बोराखेडी पोलीस पुढील तपास करित आहे.