Home आरोग्य बापरे ,आज ३५० पॉझिटिव्ह, बुलढाणा जिल्ह्यात 187 कोरोना मृत्यू !

बापरे ,आज ३५० पॉझिटिव्ह, बुलढाणा जिल्ह्यात 187 कोरोना मृत्यू !

धोका ओळखा, बुलढाणा जिल्ह्यात 187 तर राज्यात 53 हजार मृत्यू !

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा वाढत असून फेब्रुवारी महिन्यात यात मोठी वाढ झालेली आहे, आज सोमवारी सकाळी वैद्यकीय सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधीत ३५० नवे रुग्ण वेगाने वाढत असल्याचे आढळून आले आहे. बुलडाणा जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतो की काय अशी भिती आता वाटायला लागली आहे, मात्र ही वेळ घाबरून जाण्याची नाही तर कोरोना या अदृष्य सगक्ती सोबत लढण्याची आहे, ही लढाई कठीण नाही, फक्त प्रत्येकाने ‘मी जबाबदार’ अशी खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. गेल्या आठवडाभरापासून बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होताना दिसत असून आता खबरदारी घ्यावी लागेल.

बुलडाणा जिल्ह्यातील आजची स्थिती

जिल्ह्यात काल रविवार अखेर एकूण 16146 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14590 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1369 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 187 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. आज यात ३५० नवीन रुग्ण वाढले आहेत.

राज्यात ५३ हजार रुग्ण मृत्यूमुखी

राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २१ लाख ८८४ वर पोहचली आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात २ हजार ४१७ जण करोनातून बरे झाले. तर, एकूण १९ लाख ९४ हजार ९४७ जणांनी करोनामुक्त झालेले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ५२ हजार ९५६ असुन, आजपर्यंत ५२ हजार ९५६ रुग्णांचा राज्यभरात करोनामुळे मृत्यू झालेला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

(Maharashtra reported 6,971 new COVID-19 cases, 2,417 recoveries, and 35 deaths in the last 24 hours, as per State Health Department, Sunday 21 Feb)

*Date:-22.02.21*

*Total Swab Collection*
RTPCR:- 812
TRUNAT: 76
RAPID A: 413
TOTAL:- 1301

*Current Status*

Report Recived :- 1480
Positive:- 350
Negative:- 1098
Poor:- 32
Awaited: – 3296 +34 = *3330*
*Pending In Ghb Lab Around-
———————————————-
*PROGRESSIVE STATUS*
Positive Cases:- 16496
Discharged:- 14686
Deaths:- 187
Active Cases:- 1623
*Progressive Samples*
RTPCR – 99823
TRUNAT – 7701
RAPID – 37444
*TOTAL Sample- 144969*
*Positivity Rate* – 11.37 % (Progressive + ve 16496)
*Positivity Rate* 23.64 % (Todays +ve . 350)
*Death Rate* _ 1.13 %
*Recovery Rate* :- 89.02 %

 

कोविड योद्धे काय म्हणतात,
पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here