Home हॅलो बुलडाणा आ. फुंडकर यांनी इतिहास घडवला; जे मोठ्या शहरात शक्य नाही ते ग्रामीण...

आ. फुंडकर यांनी इतिहास घडवला; जे मोठ्या शहरात शक्य नाही ते ग्रामीण भागात घडलं!

 

लोकनेते स्व़.भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनात मंजूर होते काम

खामगांव शेगांव हा दोन तालुक्यांना जोडणारा पूल

रेल्वे क्राँसींगवर उडडाण पुलाचे बांधकामाचा आमदार ॲड.आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते भव्य़ पाया भरणी समारंभ
13 कोटी खर्च करुन होणार उडडाण पुल

खामगाव : आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी मागील कार्यकाळात अब्जो रुपयांची कामे खामगांव विधानसभा मतदार संघात खेचून आणली. हयावेळी लोकनेते स्व़.भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनात खामगांव शेगांव मतदार संघाला जोडणारा जलंब रेल्वे क्रॉसींगवर उडडाण पुल मंजूर करण्यात आला आहे. सदर उडडाण पुलाचे आज सोमवार दि.22 फेब्रुवारी 2021 खामगांव विधान सभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर याच्या शुभहस्ते दु.4.00 वा भव्य़ पायाभरणी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्या कार्यकाळात खामगांव विधानसभा मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलून गेला आहे. अब्जो रुपयांची कामे पुर्ण झाली असून खामगांव माटरगांव रस्त्यावर जलंब येथे रेल्वे क्रॉसींगमुळे मोठया प्रमाणात वाहतुकीस खोळंबा निर्माण होऊन प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्यासाठी लोकनेते स्व़.भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनात जलंब येथील हया रेल्वे क्रॉसींग वर उडडाणपुलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले होते.
खामगांव शेगांव हया दोन्ही तालुक्यांना जोडणारा असा हा अत्यंत महत्वाचा रस्ता असून हयाठिकाणी 13 कोटी खर्चाचा उडडाण पुलास मंजूरात देण्यात आली असून सदर उडडाण पुलाचेखामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर यांच्या शुभ हस्ते व भाजपा तालुकाध्यक्ष विजय भालतडक यांच्या अध्यक्षतेत सोमवार 22 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी ४ वाजता भव्य़ पायाभरणी समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
तरी हया पायाभरणी संमारंभास हया पंचक्रोशीतल नागरीक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे व हया ऐतिहासीक विकास कामाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी खामगांव विधानसभा मतदार संघाचे वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here