Home जागर पंचांग पाहले, शुभ मुहूर्त शोधलं ,  लगीन ठरलं, मग का असं विपरीत...

पंचांग पाहले, शुभ मुहूर्त शोधलं ,  लगीन ठरलं, मग का असं विपरीत घडलं…!

एडिटर डेस्क

कोरोनाने यु टर्न घेतला आणि आपण पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलो, दुकाने व्यवहार ठप्प होण्याची स्थिती आहे, शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे अनेक कोरोनाची साखळी  तोडण्यासाठी नवे नियम, निर्बंध  लागू करण्यात येत आहेत. दरम्यान लग्न सोहळे सुद्धा प्रभावीत होत आहेत. पंचांग पाहले, शुभ मुहूर्त शोधलं ,  लगीन ठरलं, मग का असं विपरीत घडलं…! असा प्रश्न आता उपवरवधू ना पडत आहेत.

लग्न आयुष्यात महत्त्वाचे असते. लग्नात मनासारखी हौस, मौज केली जाते. मात्र मागच्या आणि या वर्षीच्या लग्न मौसमाच्या आनंदावर कोरोनाने पाणी फेरले. आज अमरावती आयुक्त पीयूष सिंह यांचा आदेश धडकला आणि लग्नाच्या कार्यक्रमावर जणू बंदी आहे. नव्या नियमानुसार वर वधू सह फक्त 25 जण लग्नाच्या वेळी हजर राहू शकतात, या नियमाचे उल्लंघन केलं तर आयोजक, मंगल कार्यालय मालक यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात.

नव्या निर्णयामुळे ‘बँड बाजा बारात’ ला मनाई आहे. त्यामुळे ज्यांचे लग्न ठरलं त्याचा आता चांगला हिरमोड झाला आहे. लग्न लागायच्या आधी भटजी म्हणतात, वधू आणि वराचे मामा पाठमागे उभे राहतील, म्हणजे नवरदेव, नवरी, मामे, भटजी असे 5 लोक झाले, लांडगे, कुरळ्या आणि आई बाबा इतके लोक पकडले तर 25 चा कोरम पूर्ण होईल, मग वराडी मंडळी  जाईल कोठे असा प्रश्न आहे. त्यामुळे 25 जण बोलावताना नातेवाईक, मित्र, मानपान जपणारे सोयरे, भावबंद यांना कोण सांभाळेल असा प्रश्न लगीनघरी पडत आहे. पंचांग पाहून मुहूर्त ठरलं पण कोरोनाने विपरीत घडलं, याचा अर्थ  पंचांग थोतांड आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे बोलले जात आहे.
( यालेखा बाबत आपले मत नोंदवा : 9423237001)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here