अमरावती विभागातील कोरोनाचा प्रार्दभाव झालेल्या शहरी व ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याकरीता प्रतिबंधित क्षेत्र वगळता उ्वरित अमरावती विभागातील शहरी व ग्रामीण भागासाठी खालीलप्रमाणे सुधारित निर्देश देण्यात येत आहेत.
१. सर्व प्रकारची दुकाने/आस्थापना हया सकाळी ९.०० ते सायं. ५.०० वा. पर्यंत सुरु राहतील.
२. महानगरपालीका/नगर परिषद/नगरपालीका क्षेत्रातील ज्या उद्योगांना सुरु ठेवण्याकरीता यापूर्वी
परवानगी देण्यात आलेली आहे ते सर्व उद्योग सुरु ठेवण्याकरीता परवानगी राहील.
३. सर्व प्रकारचे शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आरोग्य व वैद्यकीय, कोषागार,
आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, NIC, अन्न व नागरी पुरवठा, FCI, N.Y.K., महानगरपालीका/ बँका
सेवा वगळून) हया १५% किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राहय धरून सुरु
राहतील.
४. सर्व प्रकारच्या खाजगी कार्यालयातील आस्थापना हया एकूण १५ % किंवा कमीत कमी १५ कर्मचारी
यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राहय धरुन सुरु राहतील.
५. ग्राहकांनी दुकानामध्ये खरेदी करण्याकरीता जवळपास असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार
यांचा वापर करावा. शक्यतो दुरचा प्रवास करुन खरेदी करणे टाळावे.
६. सर्व प्रकारची उपहारगृहे/हॉटेल्स प्रत्यक्ष सुरु न ठेवता फक्त पार्सल सुविधेस परवानगी राहील.
७. लग्नसमारंभाकरीता २५ व्यक्तींना (वरधू व वरासह) परवानगी अनुज्ञेय राहील.
८. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये (विद्यापीठ, महाविद्यालये, शाळा) येथील अशैक्षणीक कर्मचारी,
संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपत्रीका तपासणे, निकाल घोषित करणे इ.
कामाकरीता परवानगी अनुज्ञेय राहील.
९. मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरु राहील आणि वाहतूक साठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही.
१०. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतुक करतांना चार चाकी गाडीमध्ये चालकाव्यतीरिक्त इतर ३
प्रवासी अनुज्ञेय राहतील. तीन चाकीगाडी (उदा. ऑटो) मध्ये चालकाव्यतीरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर
हैलमेट व मास्क सह २ प्रवासी यांना परवानगी राहील.
११. आंतर जिल्हा बस वाहतूक करतांना बस मधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ५०% प्रवाशी सह
सोशल डिस्टंसिंग व निर्जतुकीकरण करुन वाहतूकीकरीता परवानगी अनुजेय राहील. याकरीता विभागीय
नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, अमरावती यांनी नियोजन करावे.
१२. सर्व धार्मिक स्थळे ही एकावेळी १० व्यक्तीपर्यंत मर्यादीत स्वरुपात नागरिकांसाठी सुरु राहतील.
१३. ठोक भाजीमंडई सकाळी ३.०० ते ६.०० या कालावधीत सुरु राहील. परंतु सदर मंडईमध्ये किरकोळ
विक्रेते यांनाच प्रवेश राहील.
१४. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची
शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, हे बंद
राहतील.
१५. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची
सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाटयगृहे, प्रेक्षकगृहे, व इतर संबंधितठिकाणे ही बंद राहतील.
१६. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन हे याकालावधीत बंद राहतील.
यापुढे सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी ९.०० ते सायं. ५.०० पर्यंत सुरु राहतील. आठवडयाअखेर शनिवारी सायंकाळी ५.०० ते सोमवारी सकाळी
७.०० पर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी बंद राहतील. आठवडा अखेर असलेल्या संचारबंदीच्या वेळी
दुग्धविक्रेते/डेअरी यांची दुकाने ही यापुढे सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत (आठवडयाचे ७ ही दिवस)
नियमितपणे सुरु राहतील. सद्यस्थितीमध्ये MIsslon Begln Agaln अंतर्गत जी सूट देण्यात आलेली होती
ती रद्द करुन, उपरोक्तप्रमाणे निर्बंध दिनांक ०१.०३.२०२१ रोजी सकाळी ८.०० वा. पर्यंत घालण्यात येत आहेत.
सबब, वरीलप्रमाणे आपल्या जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्याकरीता
प्रतिबंधात्मक उपाययोजनेची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याकरीता आपल्यास्तरावरुन योग्य ते आदेश
तातडीने निर्गमित करुन, तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा.
-पीयूष सिंह
विभागीय आयुक्त,