शेगाव: अ.भा.वऱ्हाडी साहित्य मंच अकोला द्वारा आयोजीत ४थे अ.भा.साहित्य संमेलन दिनांक २३ फेब्रुवारी रोजी मथुरा लाॕन , शेगाव येथे आयोजीत केले होते . परंतु जिल्ह्यात कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमास निर्बंध आले आहेत .त्यामुळे हे संमेलन पुढे ढकलण्यात येत आहे .कोरोना परीस्थिती आटोक्यात आल्यानंतर पुढील तारीख कळविण्यात येईल असे संमेलनाचे कार्याध्यक्ष नितिन वरणकार यांनी कळविले आहे…