मुंबई: राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर
काढल्यामुळे सर्वत्र चिंतेच वातावरण निर्माण
झाले आहे. दरम्यान आता कोरोनाच्या पुन्हा
झालेल्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या
परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे (Uddhav Thackeray) राज्यातील
जनतेशी संवाद साधणार आहेत.महाराष्ट्रात
पुन्हा नव्यानं लॉकडाऊन लागणार का अशी
जनतेत चर्चा आहे. त्यावर संभ्रमही मोठ्या
प्रमाणात दिसतो आहे, त्यावर काही ठोस
बोलतील अशी अपेक्षाही आहे.
उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ७ वाजता
राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.
यावेळी मुख्यमंत्री नक्की कोणत्या मुद्द्यांवर
बोलणार, कोरोनाला रोखण्यासाठी कोणती
मोठी घोषणा करतात. तसेच कोरोनाला
रोखण्यासाठी कुठली नवी नियमावली जाहीर करतात की कोणती मोठी घोषणा करतात याकडे लक्ष लागले आहे