Home Breaking News सरकारच्या या योजनेतून मिळवा ३६ हजार पेन्शन

सरकारच्या या योजनेतून मिळवा ३६ हजार पेन्शन

 

खामगाव :सरकार शेतकऱ्यांसाठी योजना घेऊन येत असते. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशामध्ये ११.५ कोटी ग्राहकांची नोंदणी करण्यात आली आहे. या योजनेचा तुम्ही दरवर्षी लाभ घेऊ शकता, विशेष बाब म्हणजे केंद्र सरकारच्या या योजनेतून तुम्हाला ३६ हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

या शेतकरी पेन्शन योजनेमध्ये १ जानेवारी २०२१ पर्यंत २१,१०,२०७ नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. खास बाब म्हणजे केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून पंतप्रधान-किसान योजनेतून मिळालेल्या ६००० रुपयांपैकी या योजनेसाठी थेट पैसे वजा केले जातील.

तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नोंदणी करणे करणे गरजेचे आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये नोंदणी करावी. नोंदणी दरम्यान किसान पेन्शन युनिक क्रमांक आणि पेन्शन कार्ड तयार केले जाईल. नोंदणी करण्यासाठी २ फोटो आणि बँक पासबुक आवश्यक आहे.

मोदी सरकारच्या योजनेचा लाभ घ्यावा : आ. फुंडकर
या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ५ कोटी शेतकर्‍यांना वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा ३,००० रुपये पेन्शन देण्यात येईल. याशिवाय PMKMY योनजेअंतर्गत १२ कोटी अल्पभूधारक आणि बाकी सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे  लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाद्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here