जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा ३०० पार झाला आहे.
आज आढळले ३०१ पॉझिटिव्ह रूग्ण तर १२३५ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. १५७२ रुग्णाचे अहवाल प्राप्त झाले आहेत.positivity rate 19.14% आहे.गेल्या आठवडाभरापासून बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होताना दिसत असून आज सर्वाधिक ३०१ कोरोणा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे जिल्हा वाशीयांसाठी ही चिंतेची बाब होत आहे, जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणात कोरोणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत असून कोरोणा रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाहीये ,त्यामुळे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पुन्हा जिल्ह्यात लॉकडाऊन होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जनतेने घाबरून न जाता कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.