Home कोरोना अपडेट्स असे आहेत तालुका निहाय कोरोनाग्रस्त

असे आहेत तालुका निहाय कोरोनाग्रस्त

कोरोना अलर्ट : प्राप्त 815 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 215 पॉझिटिव्ह
101 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.20 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1030 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 815 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 215 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 156 व रॅपीड टेस्टमधील 59 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 456 तर रॅपिड टेस्टमधील 359 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 815 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 29, बुलडाणा तालुका : पोखरी 1, केसापूर 4, दुधा 1, करडी 2, शेगांव शहर : 11, खामगांव तालुका : घाणेगांव 1, सुटाळा बु 1, खामगांव शहर : 36, नांदुरा शहर : 2, नांदुरा तालुका : पोटळी 3, संग्रामपूर तालुका : पळशी 1, सोनाळा 1, चिखली तालुका : हातणी 2, किन्होळा 3, टाकरखेड हेलगा 1, खैरव 2, चांधई 1, अंत्री 1, पळसखेड 1, गोद्री 3, पेनसावंगी 1, जांभोरा 1, अंचरवाडी 1, पिंपळगांव सोनाळा 1, मरखेडा 2, दे. घुबे 1, वळती 1, चिखली शहर : 23, मलकापूर शहर : 26, मलकापूर तालुका : उमाळी 1, मोताळा तालुका : सारोळा मारोती 1, सारोळा पीर 1, दे. राजा शहर : 7, दे. राजा तालुका : डोढ्रा 1, सिनगांव जहागीर 1, अंढेरा 1, मेहकर तालुका : कळमेश्वर 1, डोणगांव 1, जानेफळ 6, बऱ्हाई 3, मेहकर शहर : 2, सिं. राजा शहर : 1, सि. राजा तालुका : शेंदुर्जन 1, जळगांव जामोद तालुका : सावरगांव 1, आसलगांव 3, झाडेगांव 2, लोणार शहर : 10, लोणार तालुका : पिंपळखुटा 1, सोनुना 1, अजिंठा जि. औरंगाबाद 1, चांदुर बाजार जि. अमरावती 1, अमरावती येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 215 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान सावळा ता. सि. राजा येथील 70 वर्षीय पुरूष, केळवद ता. चिखली येथील 75 वर्षीय पुरूष व गांधी नगर चिखली येथील 65 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 101 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : सिद्धीविनायक कोविड हॉस्पीटल 19, स्त्री रूग्णालय 12, अपंग विद्यालय 24, दे. राजा : 5, चिखली : 8, नांदुरा : 3, जळगांव जामोद : 7, मेहकर : 1, सिं. राजा : 3, मलकापूर : 7, लोणार : 1, खामगांव : 8, शेगांव : 2, मोताळा : 1,
तसेच आजपर्यंत 119196 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14496 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14496 आहे.
आज रोजी 1922 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 119196 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 15845 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14496 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1163 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 186 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
****
जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी घेतली कोविशिल्ड लस
बुलडाणा,(जिमाका) दि.20 : कोरोनाविरूदध निर्णायक लढाई सुरू असून या विषाणूवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळविण्यासाठी कोविशिल्ड लसीचे लसीकरण जिल्हयात सुरू आहे. त्यानुसार आज जिल्हा सामान्य रूग्णलयातील लसीकरण कक्षात जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी कोविशिल्ड लस घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तडस उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले, लसीकरणाच्या लाभार्थ्यांनी टप्प्यानुसार अवश्य लस घ्यावी. कुठल्याही प्रकारे अफवांना बळी न पडता लस टोचून घ्यावी. लस ही पुर्णपणे सुरक्षीत असून 100 टक्के खात्रीशीर आहे.
******************

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here