Home शेगाव विशेष पुरस्कारांचे श्रेय गावकऱ्यांच्या एकजुटीला -खा.प्रतापराव जाधव

पुरस्कारांचे श्रेय गावकऱ्यांच्या एकजुटीला -खा.प्रतापराव जाधव

खातखेड – बोंडगाव गट ग्रामपंचायतला स्मार्ट ग्राम पुरस्कार,  पत्रकार अनिल उंबरकार यांचाही सत्कार

शेगाव : तालुक्यातील खातखेड – बोंडगाव गट ग्रामपंचायतला पंचायत समिती शेगांव अंतर्गत स्व.आर.आर ( आबा ) पाटील सुंदर गांव (स्मार्ट ग्राम) पुरस्काराने गौरवण्यात आले.या पुरस्कारांचे श्रेय गावकर्यांच्या एकजुटीला असल्याचे भारत सरकारच्या ग्रामविकास समितीचे केंद्रीय अध्यक्ष खा प्रतापराव जाधव यांनी सांगितले.
तर सरपंच रामेश्वर थारकर यांच्या गावविकासाबाबत सततचा पाठपुरावा व जिद्द ,चिकाटी बद्दल प्रशंसा केली.
पुरस्कार मिळवल्याबद्दल गावकर्यांचा खा. प्रतापराव जाधव यांनी गावाला भेट देवून सरपंच व गावकर्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख शांताराम दाणे, उपजिल्हा प्रमुख राजु पाटील मिरगे,तालुका प्रमुख उमेश पाटील, प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल उंबरकार, देशोन्नतीला पत्रकार अमर बोरसे,ह भ प विठ्ठल महाराज शेळके, जि प प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक घुले,सहाय्यक अध्यापक सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान शेगाव तालुका सरपंच संघटना अध्यक्ष तथा शिवसेना तालुका उपप्रमुख रामेश्वर थारकर व ग्रामस्थांनी खा प्रतापराव जाधव यांचे हस्ते पुरस्काराचे प्रमाणपत्र स्विकारले.

खातखेड गाव हे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मार्फ़त गेल्या तीन वर्षांमध्ये करत असलेले विविध विकास व नाविन्यपूर्ण कामांना गती देऊन विशेष सहकार्य करणाऱ्या ग्रामपरिवर्तक प्रविण भवटे यांच्या मार्फत शासनाच्या विविध योजना व गावातील समस्या, गरज लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायत यांच्यात सुसंवाद घडवत विविध कामे मार्गी लावल्याने व गावकर्यांची समर्थ साथ मिळत असल्याने हा पुरस्कार मिळवू शकलो.
– रामेश्वर थारकर
सरपंच , खातखेड

पत्रकार अनिल उंबरकार यांचाही सत्कार
दरम्यान आचार्य बाळशास्री जांभेकर स्मृती पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल प्रेस क्लब चे अध्यक्ष तथा लोकमत चे पत्रकार अनिल उंबरकार यांचाही यावेळी खा प्रतापराव जाधव यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच परिसरातील मनसगाव, भोनगाव येथील नवनिर्वाचित ग्रा प सरपंच, उपसरपंच व सदस्यांचाही खा.प्रतापराव जाधव यांनी सत्कार केला
कार्यक्रमाला उपसरपंच कामिनी अजने,ग्रा प सदस्य संजय ईलामे,बाळू इंगळे, गणेश थारकर, हरीभाऊ तायडे,सोपान उन्हाळे, सेना शाखा प्रमुख भागवत उन्हाळे, मनोहर उन्हाळे, सुधाकर कळसकार, सुभाष कळसकार, सागर थारकर,जनार्दन ईलामे,विठ्ठल इलामे,रवि वेरूळकर,आदीसह गावकरी उपस्थित होते.प्रास्ताविक पत्रकार अमर बोरसे तर संचलन अॅड सौरभ थारकर व आभार वैभव थारकर यांनी मानले.

यावेळी खा प्रतापराव जाधव यांचे हस्ते बोंडगाव येथे 16 लाख 84 ह रं खर्चाचे शाळेच्या इमारतीचे लोकार्पण व खातखेड व बोंडगाव येथे प्रत्येकी 7 – 7 लाख रूपयांची व्यायामशाळा भूमिपूजन तसेच खातखेड ग्रा प ला नेव्हर ब्लाॅक 2 लाख रुपयांचा निधी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here