Home प्रेरणदायी शेतकऱ्याचा असाही प्रामाणिकपणा

शेतकऱ्याचा असाही प्रामाणिकपणा

माणूसकीचा परिचय
आज शाळेतला शिवजयंतीचा कार्यक्रम आटोपून शेगावकडे निघालो होतो..
पातुर्डा फाट्याजवळ मला फोन आला . घाईघाईत मोबाईलसोबत खिशातले पाॕकेट बाहेर आले व खाली पडले..शेगावच्या जवळ आल्यावर लक्षात आले की आपले पाॕकेट खिशात नाही. मी परत वरवटला गेलो .जिथे चहा घेतला तिथे चौकशी केली..पण काही उपयोग झाला नाही.. शेवटी परत येत असतांना खिरोड्यावरुन डाॕ. संतोष तायडे यांनी फोन केला की तुमचे पाॕकेट वसंतराव महादेव दाणे यांना पातुर्डा फाट्याजवळ सापडले आहे ते घेवून जावे…

खिरोड्यात डाॕ तायडे यांच्या घरी मला वसंतराव दाणे यांनी खुप आनंदाने पाॕकेट परत केले ..त्यात पैसे , आधार कार्ड , पॕन कार्ड , दोन ATM कार्ड व काही पावत्या होत्या…

वसंतराव भाऊ आल्पभूधारक गरीब शेतकरी आहेत . त्यांच्या जागी दुसरे कोनी असते तर पैसे काढुन पाॕकेट फेकून दिले असते.. वसंतराव भाऊंचा स्वभाव साधा सरळ आहे..त्यांनी मला त्यांच्या घरी नेले … सगळ्या परिवाराची भेट करुन दिली…आणि त्यांच्या मुलीचा बायोडाटा दिला व चांगलं स्थळ शोधन्याची जबाबदारी दिली…
मी जबाबदारी स्विकारुनच घरी परत आलो..
आज वसंतराव भाऊसारख्या देव लोकांमुळे समाजात माणूसकी जिवंत आहे.
-नितिन वरणकार
शेगाव9763247494

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here