Home Breaking News DYSP पथकाची अवैध दारू विक्री विरोधात धडक कारवाई

DYSP पथकाची अवैध दारू विक्री विरोधात धडक कारवाई

 

खामगाव : उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. अमोल कोळी साहेब खामगांव यांचे पथकाने अवैध दारु वाहतुक करणारे इसमांना पकडले असून दारू साठा जप्त केला आहे.DYSP पथकाची अवैध दारू विक्री विरोधात धडक कारवाई करत सव्वालाखाचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक केली आहे.

दारू तस्करावर पोलीस पाळत ठेवून होते, दरम्यान गुरुवारी रात्री आकाश राजु कु-हाडे वय 26 वर्ष रा. पारखेड ता. खामगांव जि. बुलडाणा, 2. अजय देविदास रामेकर वय 19 वर्षे रा, टेंभुर्णा ता, खामगांव हे महामार्ग क्रमांक 6 वर जुगनु टी पॉईंट 18 फेब्रुवारीच्या रात्री 11.30च्या सुमारास अवैधरित्या दारू वाहतूक करतात आढळून आले. त्यांच्या कडून दुचाकी सह 50,202/-रुपायाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच अमोल सुधाकर जाभे वय 32 वर्षे रा. गोधनापुर ता, खामगांव यास घटनास्थळ ऋ्शी संकुल टी पाँईंट जवळ अवैध दारू नेताना पथकाने पकडून दुचाकीसह
68,096/- रु चा मुद्देमाल जप्त केला आहे.शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 58/2020 क.65 (आ) म.दा.का. नुसार पो.ना. सुधाकर थोरात यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. अरविद चावरीया साहेब, बुलडाणा मा. अपर पोलीस अविक्षक श्री. हेमराजसिंह राजपुत साहेब, खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली व उपविभागिय पोलीस अधिकारी श्री अमोल कोली सा खामगांव यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलीस अधिकारी, खामगांव यांचे पथकातील पो ना. सुधाकर थोरात, पो.का. विशाल कोळी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here