संग्रामपूर : 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 पासून अवकाळी पावसाने तालुक्यामध्ये थैमान घातला विजेच्या गडगडाटासह तालुक्यांमध्ये पाऊस धोधो बरसला त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामध्ये गहू, हरभरा ,मका ाकांदा , टरबूज पिकांचे नुकसान झाले आधीच मागील वर्षी करोणा या वैश्विक महामारी सलमान घातल्यामुळे टाळेबंदी च्या काळापासून शेतकऱ्यांच्या पिकाला पाहिजेत असा भाव मिळाला नाही आतासुद्धा जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली त्यामुळे आज झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तोंडाशी आलेला गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आता पुढील संसार कशाप्रकारे चालावा याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर थाट मांडून आहे बटाटे, टोमॅटो, मिरची, फूल गोभी ,पत्तागोबी, चांभार वांगे, या पालेभाज्यांना आधीच बाजार भाव कमी मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्याचा लागवड केलेला पैसा सुद्धा निघत नसल्याची ओरड शेतकरी करीत आहे त्यामध्ये आता तोंडघशी आलेल्या गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे संग्रामपूर तालुक्यामधील संग्रामपूर, वरवट बकाल, बावनबीर, टुनकी, सोनाळा, लाडणापुर आलेवाडी वसाळी ,काटेल ,कोलद येथील लाडणापुर येथील सागर विजय जयस्वाल गट क्र 7 मधील गहु पूर्णतः जमीनदोस्त झालेला आहे या गावांमध्ये गहू पिकाचे नुकसान झालेले पाहावयास मिळाले आधीच शेतकरी संकटात असताना हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा करून घेतला आहे पिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे