Home Breaking News आरोग्यमंत्री राजेश टोपेही कोरोनाच्या विळख्यात

आरोग्यमंत्री राजेश टोपेही कोरोनाच्या विळख्यात

मुंबई : कोरोना काळात राज्याच्या आरोग्य विभागाचा भर डोक्यावर घेत धावपळ करणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे अखेर कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे.

‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.’ अशा आशयाचे ट्विट करून राजेश टोपे यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचं संकट पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here