Home जागर श्रीमंत योगी : छत्रपती शिवराय….!

श्रीमंत योगी : छत्रपती शिवराय….!

श्रीमंत योगी : छत्रपती शिवराय….!
शिवरायांचे आठवावे रूप l
शिवरायांचा आठवावा प्रताप ll
अवघ्या भारतीय उपखंडामध्ये नव्हे संपूर्ण देशामध्ये ज्यांचा लोक लढा त्यांचा दरारा जनत असते पण ज्यांचा गनिमी कावा ज्यांचे लोक कल्याणकारी राज्य ही सर्वांना आजही प्रेरणा देत राहते छत्रपती शिवराय खऱ्या अर्थाने लोक लढ्याचे नायक होते त्यांचा लढा दलित पीडित सर्वसामान्यांसाठी होता हक्काच्या न्याय्य मागण्यांसाठी होता आणि म्हणून त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्य हे सदोदित त्यांच्या दिमाखदार यशाची तेजपत्ता का फडकवीत आजही वैभव शाही शिवशाहीची आठवण करून देते छत्रपती शिवरायांचा लढा हा केवळ कुणा एका व्यक्तीसाठी नव्हता एका घराण्यासाठी नव्हता तर मराठी माणसाच्या मराठी अस्मितेचं राज्य या भूभागावर ती व्हावं अशी स्वप्न जिजाबाईंनी पाहिली होती त्या राजमाता जिजाऊंच्या शिवबांच ते खर स्वप्न साकारल्या गेलं होतं आणि त्या स्वप्नात रंगवले गेले होते सर्वसामान्यांचे नायक ज्यामध्ये तानाजी मालुसरे बहिर्जी नाईक भीमराव बाजी पासलकर भीम या वाघ येसाजी कांक बाजीप्रभू देशपांडे शिवा काशीद जिवा महाला या सर्व नायकांचे महानायक म्हणजे छत्रपति शिवराय श्रीमंतयोगी होत. छत्रिय कुलवंत, बहुजन प्रतीपालक अशी ख्याती ज्यांची होती. त्या छत्रपती शिवरायांच्या प्रतापाचा गजर दिल्लीच्या तख्ताला ज्यांनी हलवून सोडले. तो आज जागे करण्याची वेळ म्हणजे शिवजयंती उत्सव.
आजही आठवतात त्या ओळी
प्रतिपश्र्चचंद्र लेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ll
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ll
छत्रपती शिवा्जी महाराज हे अवघ्या तरूणाईसाठी व सकल मानव जातीसाठी प्रेरणेचा व स्फुर्तीचा खळखळणारा अखंड झरा आहेत. आजच्या तरूणाईचा खरा आदर्श कोणाला मानावे तर ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय. एक प्ररेणा्दायी आदर्श ते आहेत. एक संयमी योद्धा, उत्कृष्ट प्रशासक, रयतेचे जाणते राजे या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले ते महाराष्ट्रासहित अवघ्या भारतभूमीवर विजयी संकल्प यशस्वी करण्याकरीताच. आई जिजाऊ मा साहेबांच्या शिस्त, स्वाभिमान व संस्कारातून घडत गेलेल्या शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. गुलामगिरीच्या, परकिय सत्तेच्या बेड्या तोडून टाकण्यासाठी त्यांना परिस्थितीने साथ दिली असेल किंवा नसेल परंतू त्यांनी जाज्वल्य राट्राभिमान व तयार केलेला एक- एक शेलका बहाद्दूर मावळा सरदार यांच्या बळावर चारही पातशहांना नामोहरम करून वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षातच आपल्या स्वराज्याचा राज्याभिषेक करणारे छत्रपती शिवाजी महाराज एक मराठी झंझावातच होते. सामान्य शेतकरी, कष्टकरी मावळ्यांनी या स्वराज्याच्या निर्माणाला खरा आकार दिला. त्यांचा गौरव करताना एक बखरकार वर्णन करतानालिहितो-
सदृढ, सावळे, कलह प्रिय अन स्वाभिमानी।
दिले घेतले बोलत लढती मरहट्टे मैदानी।।
तुका म्हणे आपुले बळ । युक्ती काळ कारण ।। तुकारामांच्या या वचनानुसार कोणतेही कार्य यशस्वी करायचे असल्यास ते कार्य करणा्-याच्या कर्त्याला स्वतःची शक्ती म्हणजे बळ व स्वतःचे चातुर्य म्हणजे प्रज्ञा बुद्दीचा वापर तर करावा लागतोच त्या गोष्टी महत्त्वाच्या असतातच सोबत सर्व गोष्टींना मर्यादा घालणारी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळ म्हणजेच तत्कालीन काळातील एकूण परस्थिती होय. होय. काळाच्या मर्यादा प्रत्येक कर्त्यास असतात. बळ व बुद्धी यांना मर्यांदा घालणारी महत्त्वाची बाब म्हणजे काऴ होय. थोर इतिहास संशोधक प्रा. सदानंद मोरे असे म्हणतात- “शिवकाळ हा मध्ययुग म्हणून ओळखला जातो. समाजव्यवस्थेचा विचार केला तर तिला सरमजामशाही अथवा वतनदारी म्हणता येईल. थोडक्यात असे म्हणता की, परिस्थिती आणि काळ यांच्या मर्यादा लक्षात घेून शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला तर, शिवाजीराजांनी त्यांना उपलब्ध होऊ शकणा-या प्रत्येक शक्यतेचा व संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतलाच;पण त्या मर्यादा ओलांडण्याचाही पुरुषार्थ साधला”. त्यामुळेच शिवाजी महाराज आजही एक निष्णात राजनितीज्ञ ठरतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्थापन केलेले स्वराज्य ही अवघ्या जगातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे. स्वराज्यस्थापना ही ए्क राज्यक्रांतीच मानावी लागेल. या क्रांतीसोबतच त्यांनी अवघ्या मराठी समाजातही क्रांती घडवून आणली. स्वराज्य स्थापना म्हणजे केवळ परकियांच्या दास्यातून मुक्तता एवढा्च मर्यादीत अर्थ घेता येणार नाही. जुलूम करणा-या स्वकियांचाही बंदोबस्त करण्याचे धाडसी पाऊल उचलले. त्याचप्रमाणे स्वधर्माचे व स्वसंस्कृतीचे रक्षणाचेही महत्त्वाचा विचार त्यामागे होता. या वरून त्यांच्या परखडपणाच्या ऐतिहासिक महती लक्षात येते. असे इतिहासाचे थोर अभ्यासक डॉ.जयसिंगराव पवार म्हणतात.
विश्वास, नितीमान जीवन यांचा अलौकिक जीवंतपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. सामान्य शारीरिक उंची असणा-या छत्रपतींनी आपल्या अलौकिक कर्तृत्वाच्या बळावर असामांन्य उंचीचे स्थान आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात निर्माण केलेले आहे. वडिलांची आदिलशाहीची चाकरी मला करावयाची नाही. असा बालवयातच त्यांनी केलेला संकल्प त्यांच्या स्वतंत्र व धारिष्ट्यपूर्ण विचांरांची जाणीव करून देतो. संकट कोणतेही असो त्यावर विजय प्राप्त करण्याचे कसब छत्रपती शिवरायांनी त्याच्या मनात व मनगटात निर्माण केले होते.
त्यांच्या बद्दल एक मराठी शाहिर आपल्या लेखनीने वर्णन करतांना म्हणतो-
“मरणाच्या घोर जबड्यात घालूनी हात, मोजती दात
ही जात आमुची, पहा उलटूनी पाने आमुच्या इतिहासाची”
अशा हिंमतीची सदैव साक्ष देणारे छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्त्व युवकांसाठी नेहमीच प्रेरणादायी आहे. आज युवकांनी छत्रपतींचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यावरील संकट हे माझ्या देहावरील व जीवावरील संकट आहे असा भाव छत्रपती शिवरांनी प्रत्येक मावळ्याच्या मनात निर्माण केला होता. मरणासाठी तयार असणारा प्रत्येक मावळा हा म्हणजे हजारोंचं सैन्य होता. दूर्दम्य आत्मविश्वास व प्रखर इच्छाशक्ती च्या बळावर काबीज केलेले गडकिल्ले छत्रपती शिवरायांच्या व मावळ सेनेच्या कुटनितीचा व कर्तबगारीचा संदेश आजही आपल्याला देतात.
बहूजनांचे जाणते राजे असणारे शिवाजी महाराज शेतक-यांच्या शेतीबद्दल व त्याच्या परिस्थीबद्दल नेहमीच संवेदनशिल मनस्थिती ठेवणारे आदर्श राजे होते. शेतक-यांच्या शेतातून जाणा-या सैन्यास उद्देशून त्यांचा संदेश खूप चिंतनीय आहे- “शेतक-यांच्या भाजीच्या देठाचेही नुकसान होता कामा नये”. यावरून त्यांच्या शेती कुळधर्माची रक्षण कर्त्याची भूमिका स्पष्ट होते. छत्रपतींच्या ह्या विचारधारेची कास धरण्याची गरज आज सातत्याने निर्माण होत आहे. त्यांची खरी शक्ती त्यांनी निर्माण केलेल्या विचारात व माणसात होती. म्हणूनच त्यांनी आपल्या जीवनकार्यात सदैव विजयी संकल्प साकार केले होते. शिवजयंती निमित्त त्यांना मानाचा मुजरा!
– प्रा.डॉ. हरिदास आखरे
श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविदयालय दर्यापूर,
मो. 7588566400

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here