Home जागर संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

*शेगाव येथे क्रांतिसूर्य जगतगुरू श्री.संत सेवालाल महाराज यांची 282 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम श्री. सेवालाल महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून भोग लाऊन अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. जानकिराम चव्हाण तथा प्रमुख मार्गदर्शक श्री. मोहनसिंग चव्हाण, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणपत राठोड,कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरसिंग चव्हाण हे होते,
” मोहन चव्हाण यांनी सतगुरू सेवालाल महाराजंच्या जिवन चरीत्रावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.जगतगुरु सेवालाल महाराजा यांची शिकवन समस्त माणव जातीच्या कल्याणासाठी होती. *जाळजो,छाळजो,पचज मानजो* या आोळीतुन ते सांगतात की,कोणतीही गोष्ट पहीले समजुन घ्या त्यानंतर त्यावर सदसदविवेक बुध्दीने चिंतन करा त्यानंतर तुमच्या पंचज्ञानेद्रियांना ती गोष्ट पटत असेल तर तिचा स्विकार करा अन्यथा नाकारुन टाका.

तसेच शिक्षणाने माणूस आत्मनिभर होतो या अर्थाने
*”शिकच शिकावच शिकेराज घडावच | शिक जेरी साज*
*पोळी ज्यादा शिक जेन घीयेर कचोळी,शिक्षणेती कुळीर उद्धार वे जावं छ”* असा विज्ञानवादी संदेश समाजाला दिला.
या कार्यक्रमात शेगाव येथील गोर बांधव श्री.राजेश राठोड,श्री.श्याम राठोड,श्री. गणेश राठोड, श्री.गणपत राठोड, श्री. जानकीराम पवार, श्री. कैलास चव्हाण,श्री.जितू राठोड,श्री. रोहिदास आडे,श्री. विनोद राठोड,श्री. सुभाष जाधव, श्री. किसनभाऊ राठोड,श्री. भाबरदोडे सर,श्री.मुकेश पवार, श्री. देविदास जाधव,श्री. विनोद राठोड,श्री.अनिल राठोड,
श्री. राजेश चव्हाण,श्री.संदीप राठोड,श्री. विनायक पवार,शेगाव येथील समस्त गोर बांधव उपस्थित होते.शेवटी कार्यक्रमाचे आभार श्री. अनिल पवार यांनी केले.
या सदरहू जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सामाजिक अंतर पाळून तथा मास्क लावून कोरोना नियमाचे पालन करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here