संग्रामपूर/ प्रतिनिधी
जिल्ह्यात कुष्ठरोग आणि क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. यासाठी पुरुष फ्रंटलाईन स्वंयसेवक आणि स्त्री फ्रंटलाईन स्वंयसेविका यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविण्यात यावा असे प्रशासनाचे आदेश असताना.आरोग्य विभाग मात्र आशा व गटप्रवर्तकांना घेऊन हे अभिमान राबवित आहे. आधिच कोविड १९ च्या कामाचा प्रचंड बोजा असतांना वरतून परत ह्या अभियानाचे काम आशा वर्करला करायला लावणे शिवाय त्यासाठी दिला जाणारा मोबदला अत्यंत तूटपूंजा तोही एक एक वर्ष मिळणार नसेल तर हा फार मोठा त्यांच्यावर अन्याय आहे. आरोग्य विभाग कुठल्याही प्रकारचे अभियान असो अथवा सर्वेक्षणाचे काम असो हे आशा वर्करकडेच सोपविले जाते.परंतू त्या बदल्यात त्यांना खरच काही परवडते कि नाही ? याचा विचार कोणीच करित नाही. हे त्यांच्या श्रमाचे शोषण नाही तर काय? असा सवाल निर्माण होतो.त्याला विरोध करण्यासाठी आज दिनांक १७ फेब्रुवारी रोजी संग्रामपूर तालुक्यातील सर्व आशा व गटप्रवर्तकांनी सीटूच्या नेत्रुत्वात आंदोलन करून आपल्या तालुका आरोग्य अधिकारी यांना आपल्या वर होणाऱा अन्याय, पल्सपोलीओ साठी दिला जाणारा असमान मोबदला,महिन्याच्या ५ तारखे पर्यंत मासिक मोबदला देण्यात यावा या सारख्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन संघटनेच्या उपाध्यक्ष रश्मी ताई दुबे,जिल्हा सचिव मंदा मसाळ,गोदावरी खंडेराव,उर्मिला माठे,इंदिरा इंगळे,सोनिया नांदणे,सारिका भास्कर, अन्नपूर्णा कुकडे,सविता तायडे वर्षा जाधव,मिनाक्षी पान्हेरकर,मंगला सैरीशे,,किरण राजणकर,वनिता गायिकी,उषा गायगोळ ,संध्या दाते,शशिकला कास्देकर, मंगला म्हसाळ,विजया तायडे,सुजाता वानखेडे, इत्यादीसह बहुसंख्येने आशा वर्कर्स सहभागी होत्या.