Home Breaking News उन्हाळ्यापुर्वीच टंचाई; ‘या’ गावात पाण्याचे टँकर मंजूर

उन्हाळ्यापुर्वीच टंचाई; ‘या’ गावात पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणादि. 17 : बुलडाणा तालुक्यातील पिंपरखेड गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. पिंपरखेड येथील लोकसंख्या 625 आहे. टँकरद्वारे या गावाला दररोज 17 हजार 200 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here