स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
शेगाव :- प्रतिनिधी.
शेगाव शहर ग.म.मंदिर परीसरात आद्य क्रांतीकारी लहुजी साळवे यांचे स्मारक आहे. शेगाव विकास आराखाळ्यात स्मारकाचे शुशोभीकरण केले खरे परंतु स्मारका मध्ये दुतर्फे तीलचित्र बसविण्यात आले होते. विकास आराखड्याच्या निमित्ताने आद्य क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा बसवयाला पाहिजे होता. परंतु असे न होता स्मारकामध्ये दुतर्फे तीलचित्र बसविण्यात आले. लहुजी साळवे यांचे कार्य पाहता लहुजी वस्ताद साळवे यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे रक्षण करणारे होते. 1817 मध्ये झालेल्या इंग्रज व मराठी सेन्यात घनघोर युद्धात मराठी सैन्याचा पराभव झाला या लढाईमध्ये लहुजींचे वडील राघोजी साळवे शहीद झाले. स्वातंत्र्यासाठी वडिलांचे बलिदान पाहून लहुजी पेटून उठले. पुणे इंग्रजांच्या ताब्यात गेले. शनिवारवाड्यावरचे भगवे निशाण उतरवून युनियन झेंडा चढवला गेला. त्याच वेळी लहुजी साळवे यांनी इंग्रजांचा बदला घेण्याचे ठरवले होते.जोगेतर देशासाठी मरेल तर देश्यासाठी अशी प्रतिज्ञा केली. लहुजी वस्ताद साळवे यांनी लहानपणीच आपल्या वडिलांकडून शस्त्रविद्येचे शिक्षण मिळाले होते. घोड्यावर बसणे, दांडपट्टा चालवणे, तलवार चालवणे, भाला फेकणे यात लहुजी साळवे निपुण होते. पुण्यात बुधवारपेठेतील गंजपेठेत त्यांची तालीम होती.
लहुजींनी संपूर्ण युद्धशास्त्राचे ज्ञान अवगत केल्यानंतर गंजपेठेतील व्यायामशाळेत देशप्रेमाने भारावलेल्या तरुणांना ते शस्त्रविद्येचे प्रशिक्षण देत व मार्गदर्शन करीत असत. आपले संपूर्ण आयुष्य खर्चून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढवय्यांची संघटना लहुजींनी उभी केली होती. 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनीच प्रशिक्षित केलेले तरुण अधिक होते. त्यांच्या या महान कार्याला तोड नाही. त्यांच्या 140 व्या पुण्यतिथी निमित्य साधून स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी आद्य क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा बसविण्याची मांगणी केली आहे. या वेळेस स्वाभिमानी कार्यकर्ते उपस्तित होते.