बुलडाणा जि.प.अध्यक्षा सौ.मनिषाताई पवार यांच्या हस्ते होणार बक्षीस वितरण
महिला भगिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
खामगांव – खामगांव शहर व तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मकरसक्रांतीनिमित्त शिवजयंतीदिनी दि.19 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी २ वाजता संत तुकाराम मंगल कार्यालय,नांदुरा रोड,खामगांव येथे महिलांकरीता हळदी कुंकू कार्यक्रम व महिलांकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी नगराध्यक्षा सौ. अलकादेवी सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाला बुलडाणा जि.प.च्या अध्यक्षा सौ.मनिषाताई पवार यांची विषेश उपस्थिती तर प्रमुख उपस्थिती म्हणून महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस डॉ. सौ. तबस्सुम हुसैन, माजी जि.प. अध्यक्षा सौ. वर्षाताई वनारे, माजी नगराध्यक्षा तथा बुलडाणा जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने यांच्यासह शहरातील विविध सेवाभावी संस्थेच्या आजी माजी अध्यक्षा व महिला पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी महिला-भगिनींकरीता हळदी कुंकू कार्यक्रम तसेच हलवे के दागिने बनाओ,पतंग सजाओ व रांगोळी स्पर्धेचे आयोजन सुध्दा करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये आकर्षक बक्षिसांची लयलुट करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमाला खामगांव मतदार संघातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन महिला काँग्रेस कमिटीच्या शहर अध्यक्षा सौ. सुरजीतकौर सलुजा, महिला तालुका अध्यक्षा सौ. भारतीताई पाटील, नगरसेविका सौ. शितल माळवंदे, नगरसेविका सौ. संगीता पाटील, महिला काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षा सौ. मायाताई तिवारी, माजी नगरसेविका अर्चनाताई डुकरे,माजी नगरसेविका कुलदिपकौर शीख,माजी नगरसेविका सौ.मंगला लोढे, माजी नगरसेविका माधुरीताई राऊत, सौ. शारदा विजय शर्मा, सौ. पुजा प्रमोद वाघमारे, सौ. सविता सुनील मानकर, श्रीमती भारती इंगळे,श्रीमती शोभाताई मिश्रा,इंगोले ताई यांच्यासह महिला काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्तींनी केले आहे.