Home कृषि वार्ता ‘लक्ष्मीनारायण’ करणार हमीभावाने हरभरा खरेदी

‘लक्ष्मीनारायण’ करणार हमीभावाने हरभरा खरेदी

खामगाव तालुक्यातील हरबरा उत्पादक शेतकर्‍याचा शेतमाल शासकीय हमीभवाने खरेदी करण्यासाठी नाफेड करिता लक्ष्मीनारायण फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीद्वारे ऑनलाइन नावनोंदनीस सुरुवात झाली आहे.
         शेतकर्‍यांनी नाव नोंदणी करण्यासाठी तलाठ्याने प्रमाणीत केलेला सातबारा,पिकपेरा,आधार कार्डची सत्यप्र्त व बँकेच्या पासबूकची सत्यप्र्त (जनधन खाते देऊ नये ) व नोंदणीसाठी मोबाइल क्रंमाकसह “लक्ष्मीनारायण” माँ जिजाऊ कॉम्प्लेक्स,एलआयसी समोर,नांदुरा रोड,खामगाव येथे किवा 7218919210 या क्रंमाकावर संपर्क साधावा ,तसेच ऑनलाइन नाव नोंदणीसाठी 7218919210 या व्हॉटसअप्प क्रंमाकावर कागदपत्रे सुद्धा पाठवुन ऑनलाइन नोंदणी करू शकतात. तरी हरबर्‍याची नफेड करिता शासकीय रू ५१०० हमीभवाने खरेदी करण्यात येईल तरी शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी.
तरी शेतकर्‍यांनी लवकरात लवकर आपला हरबरा विक्रीसाठी वरील क्रमाकावर संपर्क साधावा असे आव्हान तेजेंद्रसिंग चौहान,संचालक लक्ष्मीनारायण फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here