Home Breaking News नगराध्यक्ष, उपाध्यक्षांची पदावरून हकालपट्टी करा : वि.हि.प, बजरंग दल

नगराध्यक्ष, उपाध्यक्षांची पदावरून हकालपट्टी करा : वि.हि.प, बजरंग दल

मलकापुर:- शहरातील पारपेठ भागात नगराध्यक्ष ॲड.हरीश रावळ यांच्या प्रमुख उपस्थितीत न.प.उपाध्यक्ष हाजी रशिदखाॅ जमादार यांच्या वाढदिवसानिमित्त दि.10 फेब्रु रोजी नगरपालिका शाळा क्रमांक 2 मध्ये झालेल्या सत्कार समारंभात,सभेत समर्थकांनी शस्त्र प्रदर्शन करीत तलवारीचा नंगानाच केल्याप्रकरणी नगराध्यक्ष हरीश रावळ व उपाध्यक्ष हाजी रशिदखाॅ जमादार यांनी पदाचा दुरुपयोग  व हिंदुधर्माच्या भावना दुखावल्या प्रकरणी दोघांचीही पदावरुन तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी विश्व हिंदु परीषद जिल्हा सहमंत्री श्रीकृष्ण तायडे सह बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी आज उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, नगर परिषदेचे उपाध्यक्ष हाजी रशीदखाॅ जमादार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पारपेठ भागात मोठ्या संख्येने जमाव एकत्रित करण्यात आला होता शहरातील बऱ्याच चौकात ढोल ताशे नगारे अशी मिरवणूक काढण्यात आली होती.  कार्यक्रमाच्या ठिकाणी शहरात ध्वनी प्रदूषण होईल असे मोठे मोठे स्पीकर लावण्यात आले होते.सदर कार्यक्रम चालू असताना युवकांनी धारदार शस्त्र हवेत फिरवले, नगराध्यक्ष, उपाध्यक्षांचे हातात तलवारी असल्याचे फोटो, व्हिडिओ सोशल माध्यमां वर समर्थकांनी स्वतः व्हायरल केले आहे. या सर्व प्रकाराची हिंदुसमाज बांधवामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे . येत्या 19 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या सार्वजनिक शिवजयंती ला कोरोनाचे कारण दाखवत परवानगी नाकारण्यात आली आहे.
आयोजित कार्यक्रमाचे ठिकाणी मलकापूर नगरीचे नगराध्यक्ष ॲड हरीश रावळ उपस्थितांमध्ये होते त्यांच्यासह सत्कार मूर्ती नप उपाध्यक्ष हाजी रशीद खा जमादार यांच्या  समर्थकांनी नंग्या तलवारी हाती घेऊन नंगानाच केल्याने नगराध्यक्ष ॲड हरीश रावळ यांच्यावर गुन्हे दाखल करून रावळ,उपाध्यक्ष हाजी रशिदखाॅ जमादार या दोघांनी पदाचा दुरुपयोग केला म्हणुन दोघांवर अपात्रतेची कारवाई करुन दोघांचीही न.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर श्रीकृष्ण तायडे विश्व हिंदु परीषद जिल्हा सहमंत्री, मोहनसिंह राजपुत बजरंग दल जिल्हा गोरक्षा प्रमुख, दिपक कपले बजरंग दल तालुका संयोजक, संतोष बोंबटकार विश्व हिंदु परीषद तालुका प्रमुख,रामा मेहसरे बजरंग दल शहरप्रमुख यांच्या सह विश्व हिंदु परीषद, बजरंग दल पदाधिकाऱ्यांच्या सह्या नमुद आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here