Home Breaking News आणि राष्ट्रवादी महीला काँग्रेसने पेटविल्या चुली

आणि राष्ट्रवादी महीला काँग्रेसने पेटविल्या चुली

 

नंदाताई पाऊलझगडे यांच्या नेतृत्वाखाली अभिनव आंदोलन

शेगाव: येथे आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी च्या वतीने आज गॅस व डिझेल, पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये महिला प्रदेश सचिव नंदाताई पाऊलझगडे व शेगाव महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चुलीवर स्वयंपाक करून केंद्र सरकारचा निषेधकरण्यात आला. तसेच वाढलेली महागाई कमी करण्यात यावी यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळेस नंदाताई पाऊलझगडे महिला प्रदेश सचिव, संगीतरावजी भोंगळ,सहकार नेते पांडुरंग दादा पाटील, विनोद भाऊ साळुंके जिल्हा उपाध्यक्ष शहराध्यक्ष, मनोज शर्मा, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष भूषण दाभाडे महिला शहराध्यक्ष अलकाताई बांगर, सेवादल शहराध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ ताकोते, अल्पसंख्याक अध्यक्ष अन्सार खान, ओबीसी शहराध्यक्ष श्रीधर गायकवाड, यांच्यासह महिला कार्यकर्त्या खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई वाढली आहे. गॅस, पेट्रोल, डीझलसह जीवनावश्यक वस्तू महागल्या असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे. ही दरवाढ मागे घेतली गेली नाही तर आणखी तीव्र आंदोलन केले जाईल.
– सौ. नंदाताई पाउलझगडे
प्रदेश सचिव राष्ट्रवादी महीला काँग्रेस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here