Home हॅलो बुलडाणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य आरोग्य तपासणी उपचार व मार्गदर्शन...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य आरोग्य तपासणी उपचार व मार्गदर्शन शिबीर

स्वामी विवेकानंद विचारमंच , राष्ट्रीय क्रिडा मंडळ व स्वामी विवेकानंद नवयुवक दल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य आरोग्य तपासणी उपचार व मार्गदर्शन शिबीर

खामगाव – स्थानिक स्वामी विवेकानंद विचारमंच तथा सामाजिक बहुउद्देशीय संस्था खामगाव ,र जि एफ0018016 राष्ट्रीय क्रिडा मंडळ व स्वामी विवेकानंद नवयुवक दल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त 19 फेब्रुवारी 2021 रोजी राष्ट्रीय व्यायाम शाळा , भुसावळ चौक खामगाव येथे सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत तपासणी , उपचार व मार्गदर्शन करून उपलब्ध औषधी वाटप केल्या जाणार आहे .
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी स्वामी विवेकानंद विचारमंच तथा सामाजिक बहुउद्देशीय संस्था खामगाव र न एफ 0018016 च्या वतीने दरवर्षी वेग – वेगळ्या उपक्रमाद्वारे साजरा केला जाते . त्याच अनुषंगाने यावर्षी संस्थेच्या वतीने 19 फेब्रुवारी 2021 रोजी राष्ट्रीय व्यायाम शाळा, भुसावल चौक खामगाव येथे सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत रुग्णाची तपासणी , उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे . याशिबिरात श्रीराम हॉस्पिटलचे संचालक डॉ निलेश जाधव हे सर्व प्रकारचे फॅकच्चर , संधीवात , आमवात , मणक्याचे आजार , गुडघ्याचे आजार , टाच दुखी व कंबर दुखी या आजारांवर तपासणी व उपचार करणार आहे . तसेच द्वारका हॉस्पिटलचे संचालक डॉ राहूल खंडारे हे (हृदयरोग व मधुमेह तद्द) अर्धांवायू , फिट , मेंदू , थायरॉईड , मधुमेह , मूत्रपिंड , सर्पदंश , विंचूदंश विषबाधा , पोटाचे व यकृत , रक्तपेशी , दमा , क्षयरोग , फुफ्फुस या आजारांवर तपासणी व उपचार करणार आहेत .डॉ श्रीकृष्णजी इंगळे,डॉ अविनाशजी बडगुजर, डॉ सागर देशमुख शिबीर मध्ये सेवा देणार आहेत वरील सर्व आजारांवर तपासणी व उपचाराची आयोजकांच्या वतीने नाममात्र फी 10 रु सेवाशुल्क आकारण्यात येणार आहे.
तरी वरिल शिबिरात नांव नोंदणी करण्याकरिता अँड संजयकुमार बडगुजर – 9561959699 , अमोल बुट्टे – 7758932991 , अमित फुलारे – 9922160910 , सुनिल गुळवे – 9922390580 , विजय कासार – 8983023091 , श्याम निंबाळकर – 9370067010 , अंकित कोल्हे – 9975587678 , एकनाथ भातखेडे – 8421570616 , मनीष शमी – 9975370061 , प्रताप थोरात – 8668560988 , बंटी पिंपळे – 9881619143 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून आपली नांव नोंदणी कारावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here