Home कृषि वार्ता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत रेशीम शेतीस अनुदान

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत रेशीम शेतीस अनुदान

 

रेशीम रथास जिल्हाधिकारी यांनी दिली हिरवी झेंडी
बुलडाणा,:दि. 15 : जिल्हा रेशीम कार्यालयमार्फत सन 2021-22 मध्ये रेशीम शेतीसाठी लाभार्थी निवड करण्यासाठी महा-रेशीम अभियान 2021 ची सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांचे हस्ते महा रेशीम अभियानाचे रेशीम रथास हिरवा झेंडा दाखवून उद्‌घाटन करण्यात आले. अभियानाच्या उदघाटनप्रसंगी उप जिल्हाधिकारी (रोहयो) अनिल माचेवाड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, प्रकल्प अधिकारी सुनील दत्त फडके, तसेच भैरूलाल कुमावत, मुकुंद घाटे, रामदास आटोळे, श्रीपाद कलंत्रे, सचिन श्रीवास्तव, शिवप्रसाद मुंगळे, पवन शिंदे, दत्तात्रय शिंदे, जगदीश गुळवे, श्री. पारवे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती म्हणाले, बागायत क्षेत्र असलेल्या निवडक गावांच्या समुहामध्ये रेशीम शेतीस मोठया प्रमाणावर वाव असल्याने शेतकऱ्यांनी अभियान कालावधीमध्ये रेशीम शेती करण्यासाठी नोंदणी करून मोठया संख्येने सहभागी करून घ्यावे. वातावरण बदलामुळे पारंपारीक शेतीमधुन शेतकऱ्यांना निश्चित व शाश्वत उत्पन्न मिळणे दिवसेंदिवस जिकिरीचे होत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमखास शाश्वत उत्पन्नाची हमी असलेल्या रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

तुती पिकास शासनाने कृषि पिक म्हणुन घोषित केल्यामुळे इतर पिकाप्रमाणेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दूप्पट करणेसाठी रेशीम शेती उपयुक्त ठरणार आहे. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत रेशीम शेतीला अनुदान दिले जाते. यामध्ये तुती रोपवाटिका तयार करणे, सुधारित वाणाची तुती लागवड करणे, रेशीम कीटक संगोपन गृह बांधणे, संगोपन साहित्य खरेदी करणे या घटकांचा समावेश आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here