Home क्रीडा कंझारा येथील केजीएन ट्राॅफीमध्ये उंद्री येथील ब्लॅक कॅप संघ ठरल विजेता

कंझारा येथील केजीएन ट्राॅफीमध्ये उंद्री येथील ब्लॅक कॅप संघ ठरल विजेता

माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते विजेत्या संघाला 31 हजार रुपयांचे प्रथम बक्षीस प्रदान

खामगांव:ः कंझारा ग्रामस्थांच्या वतीने सातत्याने ग्रामीण भागासाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येत असुन क्रिकेटच्या खेळातुन खेळाडूंनी खेळाडु वृत्ती अंगी बाळगून जय पराजयाची पर्वा न करता आपल्या कलागुणांचा विकास करुन चांगल्या खेळाचे कौषल्य आत्मसात करावे. खेळाडूंनी सांघीक वृत्तीने खेळ करावा असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.  खामगांव तालुक्यातील कंझारा येथे केजीएन स्पोर्टस् क्लबच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी केजीएन ट्राॅफी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. दि.14 फेब्रुवारी 2021 रोजी केजीएन क्रिकेट ट्राॅफी स्पर्धेचा अंतीम सामना खेळला गेला.  या सामन्यांचे बक्षीस वितरण सोहळा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी नगरसेवक किषोरआप्पा भोसले,नगरसेवक अब्दुल रषीद अब्दुल लतीफ, एनएसयुआयचे षहरअध्यक्ष रोहित राजपूत,षफाभाई, बाजार समितीचे माजी संचालक श्रीकृश्ण टिकार,मो.कलीम,मो.नदीम,बबलु पठान,एजाज देषमुख,अॅड.षहजाद उल्ला खान, षफीक खान आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खामगांव तालुक्यातील कंझारा येथील केजीएन स्पोर्टस् क्लबच्या वतीने ग्रामीण भागासाठी केजीएन ट्राफी क्रिकेट सामन्यांचे मागील 17 वर्षापासुन सातत्याने  आयोजन करण्यात येत आहे.  य स्पर्धेमध्ये एकुण 32 संघांनी सहभाग घेतला. प्रथम बक्षीस 31 हजार रुपये  माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यातर्फे, तर द्वितीय बक्षीस 15 हजार रुपये बाबा कन्स्टंªक्षसन,खामगांव यांच्यातर्फे ठेवण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here