Home Breaking News रामभक्त रिंकू शर्माच्या मारेकऱ्यांना फाशी द्या- बजरंग दल

रामभक्त रिंकू शर्माच्या मारेकऱ्यांना फाशी द्या- बजरंग दल

खामगाव-राममंदिर निर्माण निधी गोळा करणाच्या दिल्ली येथील रिंकू शर्मा या युवकाची काही हत्या केली गेली, या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपींना त्वरित बेडया ठोकून फासावर लटकविण्यात यावे, अशी मागणी बजरंगदल विश्व हिंदू परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे, याबाबत खामगाव येथे एसडीओंमार्फत राष्ट्रपत्तीच्या नावे निवेदन देण्यात आले

निवेदनात नमूद आहे की, दिल्ली येथील मंगोलपुरी भागातील हिंदूत्ववादी कार्यकर्ता रिंकू शर्मा हा राममंदिर निर्माण निधी समर्पण अभियानातर्गत निधी गोळा करीत होता. याबाबत त्याला काही युवकानी धमक्या दिल्या होत्या, याविरूध्द त्याने पोस्टेला तक्रार दिली होती, मात्र पोलिसांनी काहीच
कारवाई केली नाही. दरम्यान १० फेब्रुवारीच्या रात्री काही मुस्लीम जिहादी युवकांनी शर्मा यांच्या घरात घुसून मारहाण केली तसेच सिलिंडरचा स्फोट देखील घडवून आणला. त्याचप्रमाणे काहींनी रिकू शर्मा याच्या पाठीत सूरा भोसकून त्याची हत्या केली. ही घटना संतापजनक असून याचा निषेध नोंदवत रिंकू शर्माच्या हत्याच्यांना त्वरिंत अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यातआली आहे, निवेदन देतेवेळी विहिपचे जिल्हा पालक वापूसाहेब करदीकर, बजसंगदल प्रांत संयोजक अमोल अंधारे, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विहिप शहराध्यक्ष राजेंद्रसिंह राजपूत यांच्यासह बजरंगदल, व विश्वहिंदू कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here