खामगाव : खामगाव शहरात चोरीच्या घटना वाढल्या असून तापस लागत नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. सायकल, दुचाकी चोरी , भुरट्या चोऱ्या, घरफोडी सारख्या घटना गेल्या काही दिवसांत वाढल्या असल्याचे दिसून येते.
स्थानिक भुसारा गलली भागात रविवारी रात्री चोरटयांनी धुमाकूळ घालत तीन टिकाणी हात साफ केला, चांदीच्या मुत्त्या, सिलिंडर, पाण्याच्या मोटारसह चोरटयांनी जवळपास ६० हजाराचा मुद्देमाल हंपास केला
आहे.
भुसारा गल्ली भागातील रहिवाशी संजय रमेश कासार यांच्या घराच्या बाजुला असलेल्या स्टोअररुमचे कुलूप तोडून चोरटयांनी अलमारी मधीलचांदीच्या मुत्त्या व चिल्लर असा अंदाजे ५० हजाराचा मुद्देमाल लंपास केला. याच मागातील आनंद धानुका यांनी त्यांच्या घरासमोरील रुममध्ये ठेवलेले भरलेले सिलेंडर (किं.२८००) चोरुन नेले तसेच बाहेरगावी
राहत असलेल्या शाम प्रयाल यांच्या घराचे कुलूप तोडून पाण्याची मोटार (किं.६ हजार) लंपास केली. त्याचप्रमाणे रितेश रानीलाल यांच्या घरी देखील चोरी चा प्रयत्न झाला. या सर्व घटना आज सकाळी उघडकीस
आल्या. याबाबत शिवाजी नगर पोस्टेला तक्रारी देण्यात आल्या असून वृत्त लिहेपर्यंत पोलीस कार्यववाही सुरु होती. शहरात मागील काहीं दिवसांपासून सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. पोलीसांचा चोरटयांना धाक उरलेला नसल्याने हे प्रकार घडत असल्याचे बोलल्या जात आहे. तरी पोलिसांनी शहरात रात्रीच्यावेळी गस्त वाहवावी,अरशी मागणी होत आहे. चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत असले तरी त्यांचा माग लागलेला नाही हे विशेष!