मलकापूर : नगरपरिषद कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम हातात घेऊन एक दिवस स्वच्छतेसाठी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.
स्वच्छ सर्वेक्षण 2021 आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात नगरपरिषदेतील व परिसरातील जागेत सफाई अभियान हाती घेण्यात आले आणि या कार्याला सर्वांनी उपस्थित राहून स्वच्छतेचा कामात हातभार लावला . या कार्यक्रमात मलकापूर शहराचे माननीय अध्यक्ष श्री हरीश रावळ, आरोग्य सभापती श्री मोहम्मद जाकिर मोहम्मद इस्माईल, पाणी पुरवठा सभापती श्री अनिल गांधी, माननीय मुख्याधिकारी रमेश शंकर ढगे माननिय उपमुख्य अधिकारी श्री श्रीपाद देशपांडे ,आरोग्य निरीक्षक श्री योगेश घुगे आणि इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचा समारोप “हरित शपथ” घेऊन करण्यात आला आणि यापुढेही असले कार्यक्रम घेऊन मलकापूर शहराला स्वच्छ करण्याचा ध्यास घेण्यात आला .