Home लेख शिवजयंती निमित्ताने….

शिवजयंती निमित्ताने….

करोना काळात भल्या भल्या कार्यक्रमाची वाट लागली. आणि मग त्याच कचाट्यात *’शिवजयंती’* सुद्धा आली.करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आपापल्या परीने प्रयत्न केलीत,मग इतरांनी वैयक्तिक पातळीवर त्याला *judge* केलं असो.आता काही दिवसा अगोदर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या महाविकस आघाडीच्या सरकारने शिवजयंती संदर्भात काही निर्बंध लावले आणि विरोधकांना आणि शिवरायांच्या मावळ्यांना एक मस्त विषय मिळाला. *खरं तर शिवजयंती फक्त एक दिवस साजरी करून ‘शिवराय’ समजू शकत नाही.* आणि त्यांनाच तर बिलकुलच नाही *ज्यांनी DJ लावू लावू शिवजयंती साजरी केली* . तरी पण ‘शिवजयंती’यासाठी साजरी करावी तर किमान त्यादिवसासाठी तरी ‘शिवराय ‘ आठवले जातात आणि स्मरले जातात.कदाचीत म्हणुनच शिवजयंती साजरी होते असते.त्यावर विरोधी पक्षाचे बेगडप्रेम आणि शिवरायांच्या मावळ्यांच्या आततायीपणा उघड झाला एवढा मात्र नक्की.

महाविककास आघाडीच्या राज्यसरकार ने करोना मुळे शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करू नका असे विधान केलं. आणि विरोधी पक्षांला आयत कोलीत मिळाले फक्त राजकारण करण्यासाठी.नाही तर *ज्या राजकीय पक्षांनी त्यांच्या कार्यालयात शिवजयंतीला साधं शिवाजी महाराज पूजन* (त्यांच्या भाषेत औक्षवन) नाही केलं त्यांनी आज शिवजयंती निमित्ताने वाद उपस्थित करण म्हणजे *महात्मा गांधी भक्त आहे असे सांगून नथुराम गोडसे जयंती जोर आणू आणू साजरी करण्यासारखे आहे.* बर ज्या पक्षानं याला विरोध करून आपलं शिवराय वरील बेगड प्रेम सिद्ध करण्यासारखेच आहे.बर त्यांना खरं शिवाजी महाराज यांच्या वर खरचं प्रेम उतू आलं होतं तर मग मागील पाच वर्षात त्यांचीच सत्ता होती ते *शिवरायांचे स्मारक का नाही बांधू शकले* .(खर तर त्यांना ते बंधायचेच नव्हते) शिवाजी महाराज फक्त भांडवल म्हणून ज्यांनी कोणी वापरले असतील तर ते म्हणजे ह्याच पक्षाच्या मातृसंस्था असणारी म्हणजेच *RSS* ने.बर जेंव्हा जेंव्हा *शिवराय बदनाम झाले त्या सगळ्यात यांच्याच मातृसंस्था असलेल्या विचारसरणीचीच व्यक्ती का असतात ह्यावर कोणी कधी मंथन करणार आहे की नाही?* उदाहरण द्यायच झाल्यास *’SHIVAJI IS THE HINDU KING IN ISLAMIC INDIA’* ह्या पुस्तका निमित्ताने निर्माण झालेला वाद आणि त्यावर असलेलं ह्या प्रतिगाम्यांचे मौन.शाळा कॉलेजेस सुरू करतांना ती करोनाच्या काळात सुरूच करू नये यांसाठी आंदोलने करणारी मंडळी आज शिवजयंतीचा पुळका घेऊन शिवभक्ती चा का आव आणत आहे कुणास ठाऊक?
*शाळा बंद आणि मंदिर उघडा कठीण कार्यक्रम आहेत.*

भावांनो शिवजयंती एक दिवस साजरी केली काय आणि नाही साजरी केली काय ह्याने काहीच फरक पडणार नाही.कारण त्यामुळे शिवराय कधीच कमी होणार नाहीत.आपणही शिवराय हे शिवजयंती पुरतेच घेतलेल आहेत ते जर आपण त्यांच्या *विचारसरणीसह स्वीकारलं असते तर आज शिवजयंतीही वेगळी असती आणि शिवरायांचा मावळाही!* आणि जर खरंच तसे असते तर शिवरायांनी त्यांच्या काळात शेतकऱ्यांची *भाजीच्या देठाला इजा करण्याची मुभा नव्हती* .आज मात्र *अख्खा शेतकरी संपवण्याचा कार्यक्रम* चालू आहे आणि शिवजयंतीत जोर लावू लावू DJ वर नाचणारे केंद्रातील सत्तेचा साधा निषेधही करू नाही शकत. *शिवराय प्रचंड समतावादी होते आणि सोबतच सर्वधर्मसहिष्णुही होते अगदी (शत्रूचीही कबर बांधून त्यावर आयुष्यभर दिवाबत्तीची सोय करणारे) त्यांच्या स्वराज्यात जात धर्म ठरवून माणसे स्वराज्याच्या बाहेर नाही काढल्या गेली किंवा त्यांना देशद्रोही ठरवून नाही जेरबंद केलं!आपल्या देशात मात्र NRC ,CAA च्या कलमा वरून अख्या देशातल्या मुस्लिमांना अगदी देशाबाहेर काढण्याचा बेतच जणू आखला होता आणि आपण शिवराय प्रेमी आपल्या जवळच्या मुस्लिम समाजातील मित्रांना कारण नसतानाही टाळणं सुरु केलं होत.मावळयांनो शिवराय महिलांना खूप मानसन्मान देत असत.(रांझ्या च्या पाटलाची गोष्ट) आणि आपल्या महाराष्ट्रात खैरलांजी पासून ते कोपर्डी पर्यंत आमच्या बहिणीवर रोज आमनुष बलात्कार सुरूच आहेत. आम्ही मात्र रांझ्याच्या पाटलासारखी त्याला शिक्षा देऊन मोकळं होण्याऐवजी आम्ही बलात्कार झालेल्या मुलींना विविध जातीत विभाजून त्याचंही दाबून भांडवल केले. माझ्या शिवरायांच्या मावळ्यांनो फक्त शिवजयंती साजरी करून भागत नसते तर ते शिवराय विचाराने स्वीकारायाचे असतात.आणि आपण ते बिलकुल स्विकारत नाही मग आपल्याला खरंच नैतिक अधिकार आहे का शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायचा.* मग का एवढा अट्टहास एवढा शिवजयंती जल्लोषात साजरी करण्याचा.आणि एवढे करायचं कारण काय तर काही हिंदुत्ववादी पक्षाने तुम्हांला शिवराय या विषयावर *भावनिक Blackmail* केलं म्हणून तुमच्या बुद्धीची कीव येते रे गड्यांनो.शिवराय आपले आहेत आणि आपलेच राहतील.
शिवजयंती ही १२ महिने २४ घंटे साजरा करण्याचा विषय आहे.पण बिकट परिस्थितीवर मात करून कधीकाळी माघार घेण्यात काहीच हरकत असे खुद्द शिवराय सांगायचे. तुम्ही त्याला त्यांचा *गनिमी कावा* म्हणून जगभर प्रसिद्धही केलं मात्र आपण नाही अंगिकारला. मावळयांनो शिवराय व्हा ,त्यांच्या स्वराज्याचा भाग व्हा,त्यांच्या समतावादी दृष्टीकोणाचा भाग व्हा,त्यांच्या सारखं सर्वधर्मसहिष्णु दृष्टिकोन ठेवून जगा.
तरच त्यांची शिवजयंती साजरी करण्याचा Feel तुम्हाला येईल.आणि रोज शिवजयंती साजरी केल्या सारखं वाटेल.हीच या शिवजयंती निमित्ताने तुम्हां मावळ्यांकडून अपेक्षा.उगाच कोणाकडूनही काहीही एकूण आततायीपणा नका करू.चांगलं स्वराज्य असो की चांगलं राज्य असो त्यासाठी चांगल्या प्रशासनाची गरज असते आणि आज महाविकास आघाडी सरकारने आपल्या जनतेच्या हितासाठीच (शिवरायांच्या भाषेत रयतेच्या हितासाठी).
आज हा शिवजयंती संदर्भात निर्णय घेतला तो कदाचित आजच्या घडीला योग्य असेल.सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याचा स्वीकार करावा हीच अपेक्षा.
*आणि जर आज शिवराय असते तर त्यांनी सुद्धा त्यांच्या या करोनाच्या काळात असेच किंवा किंबहुना यापेक्षाही आणखी कडक निर्बंध लावले असते.*
*करोनाच्या काळात सामाजिक उपक्रम राबवून ,शिवरायांवर लिहलेली चांगली पुस्तके वाचून व वाटून,व्यसन सोडल्याचा संकल्प करून आपण शिवजयंती साजरी करु शकतो.*
*आणि आपल्या कृतीने जर आज पोलिस प्रश्नासनाला व पोलिसांना जर का थोडा ही त्रास झाला तर आपल्या स्वराज्यातील सैनिकाला दुखावल्या गेल्याच दुःख होईल.आणि स्वराज असो की राज्य सैनिक तेंव्हाही महत्वाचे होते आणि आजही तेवढंच महत्वाचे आहेत.*

-अभयसिंह मारोडे संग्रामपूर
9423761908

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here