Home Breaking News शहर तेली समाज मंडळातर्फे तेली समाजातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

शहर तेली समाज मंडळातर्फे तेली समाजातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

खामगाव: तेली समाज पंच बंगला सुटाळपुरा खामगाव येथे तेली समाजातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन खामगाव शहर तेली समाज पंचमंडळ , महिला मंडळ युवा मंडळ यांनी आयोजन केले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयभाऊ अकोटकार तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीधर महाराज संस्थानचे अध्यक्ष गोकुळभाऊ चोपडे होते. पंचमंडळाचे अध्यक्ष राजेशभाऊ झापर्डे, ज्येष्ठ समाजसेविका सौ. विमलताई बोरे , महिला अध्यक्षा सौ. सुलोचनाताई सुलताने यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे संचालन गणेश भाऊ खेडकर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सर्वप्रथम सौ. पल्लवीताई विठ्ठलराव सोनटक्के उपसरपंच जलंब, सौ. उज्वलाताई गजानन भुमरे उपसरपंच पिंप्री गवळी, सौ. शितलताई धनंजय दिपके गारडगाव ग्रामपंचायत सदस्य, सौ.महानंदाताई कैलास खेडकर सदस्य, सौ. वर्षाताई अर्जुन खेडकर ग्रामपंचायत सदस्य गोंधनापूर, सौ. महानंदाताई विनायक भागवत ग्रामपंचायत सदस्य भेंडवळ, श्री.विनोद वरुडकर उपसरपंच भालेगाव ,श्री.गणेश भाऊ धानोरकर उपसरपंच गारडगाव, श्री. दिपक चोपडे ग्रामपंचायत सदस्य जलंब सर्व मान्यवरांचा सत्कार संताजी महाराजांची मूर्ती देऊन करण्यात आला. आभार प्रदर्शन बेलोकार सर यांनी केले. कार्यक्रमाला तेली समाज पंच मंडळ, महिला मंडळ, युवा मंडळ व समाजातील महिला भगिनी भरपूर संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here