Home खामगाव विशेष नानाभाऊ पटोले यांनी स्वीकारले येथील सत्कार समारंभाचे निमंत्रण

नानाभाऊ पटोले यांनी स्वीकारले येथील सत्कार समारंभाचे निमंत्रण

आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले अभिनंदन
मुंबई:- प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार श्री नानाभाउ पटोले यांनी दि.12 फेब्रुवारी 2021 रोजी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. मुंबईच्या ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथे नानाभाउ पटोले यांचा पदग्रहण समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराश्ट प्रदेष काॅंग्रेस कमिटीचे मावळते प्रदेषाध्यक्ष राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नानाभाउ पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. तसेच याप्रसंगी प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष शीवाजीराव मोघे, बसवराज पाटील, आमदार प्रणितीताई शिंदे, मो.आरिफ नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, कुणाल पाटील या सर्व उपाध्यक्षांनी सुध्दा पदभार स्वीकारला.
या कार्यक्रमाला प्रदेष प्रभारी एच.के.पाटील,सहप्रभारी आषिश दुआ, राज्य युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासह महाराश्ट्रातील काॅंग्रेसचे अनेक आजी-माजी मंत्री, नेते मंडळी व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी क्रांती मैदानातून काॅंग्रेसने ‘मोदी सरकार चले जाव’ चा नारा देण्यात आला.
नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नानाभाउ पटोले यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी खामगांव विधानसभा मतदार संघ व सानंदा परिवाराच्या वतीने त्यांचे पुश्पगुच्छ देउन सत्कार केले व पेढा भरवुन त्यांचे तोंड गोड केले.
काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले हे मागील 25 वर्षापासून सानंदांचे जीवलग मित्र आहे. म्हणून नानाभाउ पटोले यांनी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हातामध्ये घेतल्याबरोबरच त्यांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी खामगांव येथे जाहिर सत्काराचे आमंत्रण दिले व ते त्यांनी स्वीकारले.
यावेळी बुलडाणा जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विजयभाऊ अंभोरे,अल्पसंख्यांक सेलचे शहर अध्यक्ष बबलु पठान यांच्यासह बुलडाणा जिल्हयातील तसेच खामगांव मतदार संघातील काॅंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याने काॅंग्रेसमध्ये नवचैतन्य पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here