Home Breaking News पं. स. उपसभापतीपदी ‘हा’ युवा चेहरा!

पं. स. उपसभापतीपदी ‘हा’ युवा चेहरा!

तुषार गावंडे होणार खामगाव पं. स. चे नवे उपसभापती

खामगाव:’-* खामगाव पंचायत समिती चे नवीन उपसभापती भाजपच्या युवा फळीतीळ नेते , पळशी बु सर्कलच्या प स सदस्य तुषार विलाससेठ गावंडे होणार असल्याची विश्वसनीय माहिती द रिपब्लिक महाराष्ट्र च्या सूत्रांकडून मिळाली आहे. खामगाव पंचायत समिती च्या विद्यमान उपसभापती सौ शीतलताई मुंढे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपले नेतृत्व आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचे समोर सव्वा सव्वा वर्षाच्या फॉर्म्युला ठरला होता त्यामुळे आपला दिलेला शब्द पाळत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा स्वतःहून दिला आहे. त्यांचा राजीनामा शासनाने मंजूर केला असून आता नवीन उपसभापती निवडण्याची प्रक्रिया येत्या बुधवारी 17 फेब्रुवारी ला पंचायत समिती सभागृहात पार पडणार आहे. यासाठी गटविकास अधिकारी यांनी विशेष सभा बोलावली आहे. भाजप चे संख्याबळ अधिक असल्याने ही निवड प्रक्रिया अविरोध होण्याची शक्यता आहे. तर भाजपच्या गोटातून भाजपच्या युवा फळीतील नेते पळशी बु सर्कल चे प स सदस्य तुषार गावंडे होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. तुषार गावंडे हे अविवाहित असून सर्वात कमी वयाचे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खामगाव पंचायत समितीचे उपसभापती होणार होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here