Home शेगाव विशेष स्व आर आर पाटील ‘स्मार्ट ग्राम’ या गावची निवड ?

स्व आर आर पाटील ‘स्मार्ट ग्राम’ या गावची निवड ?

शेगाव : स्व.आर.आर ( आबा ) पाटील सुंदर गांव स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना मधून ग्रामनिवड करीता जिल्हा स्तरीय समिती हे पुनमूल्यांकन करण्यासाठी बोंडगाव खातखेड गट ग्रा प ला भेट दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी याचे आदेश नुसार जिल्हास्तरीय तपासणी कार्यक्रम प्रारंभ झाला. यात जिल्हा परिषद बुलढाणा येथील उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चोपडे यांच्या उपस्तितीत पंचायत समिती गट विकास अधिकारी सतीश देशमुख,विस्तार अधिकारी पंचायत समिती संदीप दळवी, नांगरे तसेच जिल्हा व पंचायत स्तरावरील संबंधित तपासणी अधिकारी यांनी भेट देवून माहिती घेतली दरम्यान खातखेड ग्रामपंचायत चे सरपंच तथा ग्राम परिवर्तन सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेना तालुका उपप्रमुख रामेश्वर थारकर यांनी उपस्तित अधिकारी मान्यवरांचा सत्कार केला.सदर गाव तपासनी मधे ग्राम पंचायती,प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा , अंगणवाडी तसंच प्राथमिक आरोग्य केंद्र संबधित अधिकारी कर्मचारी उपस्थित राहून तपासणी समिती सदस्यना आवश्यक माहिती देण्यात आली तसेच सदर गाव हे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मार्फ़त गेल्या तीन वर्षांमध्ये करत असलेले विविध विकास कार्यक्रमाबद्दल ग्रामपंरिवर्तक श्री प्रविण भवटे यांच्या मार्फत शासनाच्या विविध योजना व गावातील समस्या, गरज लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायत यांच्या मधे सुसंवाद घडवत विविध कामे मार्गी लावण्यात आली असे सरपंच रामेश्वर थारकर यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली त्यात गावातील एकूण लोकसंख्ये प्रमाणे लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या लाभांची गरज लक्षात घेता प्रामुख्याने गरिबी कमी करण्याबरोबर रोजगार उपलब्धी करून देणे जेणेकरून त्या घरातील अन्न , आरोग्य , राहणीमान व उपजीविका यावर बऱ्याच प्रमाणात फरक जाणवेल तसेच घरकुल मध्ये आवश्यक गरजू लाभार्थी , उज्वला योजना , पिण्या योग्य पाणी उपलब्ध करणे , रोजगाराभिमुख प्रगती करणे व शाश्वत कृषी विकास ज्यात उत्पादन , प्रक्रिया युक्त शेती , शेतीमाल गुणवत्ता व गावाचा सर्वांगीण विकास यावर कार्य एकात्मिक स्वरूपात चालू ठेवणे तसेच अभियानाच्या विविध विकासात्मक क्षेत्रापैकी शाश्वत कृषी विकास, पशु संवर्धन विकास, शिक्षण, आरोग्य, कौशल्य आणि उद्योजकता विकास, स्वस्त व स्वच्छ ऊर्जा, समाज प्रबोधन, स्वछ पेयजल आणि स्वच्छता बाजारयंत्रणा जोडणे नावीन्यपूर्ण विकास उपक्रम महिला व बाल विकास पर्यावरण व जैव विविधता या सर्वांगीण क्षेत्रांना मिळून बनलेल्या अभियानाला पुरेपूर असा न्याय देन्यात आले असे सरपंच यांनी माहिती दिली दरम्यान गावातील ग्रामसेवक एस एम सावरकर, बाजोले, सर्व स्थानिक प्रतिनिधी उपसरपंच सदस्य पोलीस पाटील अशासेविका, अंगणवाडी सेविका आरोग्य सेवक शिक्षक वृंद इतर महिला पुरुष उपस्तित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here