Home क्राईम पत्नीचा विनयभंग करून पतीवर चाकू हल्ला

पत्नीचा विनयभंग करून पतीवर चाकू हल्ला

दोन आरोपींवर गुन्हा दाखल 

संग्रामपूर :  पत्नीचा विनयभंग करून पतीला चाकूने जखमी करण्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील ग्राम वानखेड येथे घडली आहे.  याप्रकरणी सोमवारी रोजी महिलेच्या फिर्यादीवरून दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून प्राप्त माहितीनुसार येथील २८ वर्षीय विवाहित महिला घरात अंथरूंन टाकत असतांना आरोपी रमेश भारसाकडे याने वाईट उद्देशाने महिलेला कवट्यात पकडून विनयभंग केला. महिलेचा पती आरोपीला जाब विचारण्यात गेला असता आरोपी रमेश भारसाकडे व अश्विन रमेश भारसाकडे या दोघांनी संगणमत करून शिवीगाळ केली व छातीत चाकूने हल्ला करून पीडित महिलेच्या पतीला जखमी केले. पत्नीच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिस स्टेशनला दोन्ही आरोपींवर कलम ३५४, ३५४ (अ), ४५२, ३२४, ५०४, ३४ भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास तामगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विखे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here