Home Breaking News मुंबई नागपूर महामार्गवर भिषण अपघात दोन ठार तर दोन जखमी

मुंबई नागपूर महामार्गवर भिषण अपघात दोन ठार तर दोन जखमी

बुलडाणा/ 12 फेब्रुवारी
बिबी पोलीस स्टेशन हद्दीतील बिबी ते पिंप्री खंदारे या गावाच्या मध्यभागी मारुती मंदीराजवळ दुपारी दीड वाजता मोटारसायकल व नॉनो कार चा समोरासमोर भिषण अपघात झाला नॉनो कार मेहकर च्या दिशेने जात होती तर मोटरसायकल जालना च्या दिशेने जात होती
या अपघातामध्ये मोटारसायकल एम एच 47 एम 1300 मनप्रीत तेजिंदर सिंह नारंग हा जागीच ठार झाला तर नॉनो कार एमएच 32 वाय 5238 मधील अक्षय राऊत यांचा उपचारादरम्यान ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला कार मध्ये त्यांची पत्नी निकीता राऊत व मुलगा श्री राऊत हे गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी जालना हलविण्यात आले आहे
अपघाताची माहिती मिळताच बिबी पोलीस घटनास्थळी दाखल झाली असुन मोटरसायकल पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आली तर ओळख पटवण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत पुढील तपास बीबी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here