Home Breaking News सानंदा म्हणतात, ‘ये तो अभी झाॅंकी है…

सानंदा म्हणतात, ‘ये तो अभी झाॅंकी है…

बाजार समिती, नगर पालीका अभी बाकी है’

खामगांव:- खामगांव मतदार संघातील 91 ग्राम पंचायतीकरीता निवडणुक प्रक्रिया 15 जानेवारी रोजी पार पडली होती. 18 जानेवारी रोजी निकाल जाहिर झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सरपंच, उपसरपंच पदाचा निवडणुक कार्यक्रम जाहिर केला होता. सरपंच, उपसरपंच निवडीच्या तिसऱ्या टप्प्यातही काॅंग्रेस महाविकास आघाडीची बल्लेबल्ले झाली असून काॅंग्रेसने दणदणीत विजय मिळविला असा दावा करण्यात येत आहे. मतदार संघातील एकुण 91 ग्राम पंचायतीपैकी 56 ठिकाणी काॅंग्रेस महाविकास आघाडी प्रणीतचे सरपंच, उपसरपंच विजयी झाले असून वंचित बहुजन आघाडीने 15 जागांवर विजयी मिळविला असून अनेक मोठया ग्राम पंचायतीवर काॅंग्रेसची सत्ता आली असून ग्राम पंचायत निवडणूक तो अभी झाॅंकी है, कृशी उत्पन्न बाजार समिती, नगर पालीका अभी बाकी है, अषी प्रतिक्रिया माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिली आहे.

11 फेब्रुवारी 2021 रोजी तिस-या टप्प्यात झालेल्या सरपंच,उपसरपंच पदाच्या निवडणुकीत काॅंग्रेस महाविकास आघाडीचाच बोलबाला कायम राहिला असून पिंप्री कोरडे, पिंप्री देशमुख,रामनगर,राहुड,सुजातपुर,सुटाळा बु., सुटाळा खु., शीरजगांव देषमुख, टाकळी, टेंभुर्णा,वरणा, शीराळा,वाडी, विहिगांव या ग्राम पंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदी काॅंग्रेस महाविकास आघाडीचे विराजमान झाले आहे.खामगांव मतदार संघात समावेश असलेल्या शेगांव तालुक्यातील 10 ग्राम पंचायतीच्या सरपंच,उपसरपंच पदाची सुध्दा 11 फेब्रुवारी रोजी निवडणुक प्रक्रिया होउन यामध्ये 10 पैकी 8 ग्राम पंचायतीवर काॅंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहे. यामध्ये माटरगांव बु., पहुरजिरा, सांगवा,टाकळी विरो, वरुड, तिंत्रव, मच्छिंद्रखेड,मोरगांव दिग्रस या ग्राम पंचायतींचा समावेशआहे.
पिंप्री कोरडे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी काॅंग्रेसच्या सौ.सुनिता दयाराम शेळके, उपसरपंचपदी शेख मुशताक शेख मुख्तार, पिंप्री देशमुखच्या सरपंचपदी शेषराव समाधान गोरे, उपसरपंचपदी सौ.स्वाती राजु बोंडे, रामनगर ग्रामपंचायत सरपंचपदी भारत जनार्दन शेगोकार, उपसरपंचपदी अनंता त्रिकाळ, राहुड ग्रामपंचायत सरपंचपदी निलेश चिम तर उपसरपंचपदी संदिप गजानन इंगळे, सुटाळा बु.ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.सुलोचना श्रीकांत वानखडे, उपसरपंचपदी नारायण समाधान ठाकरे, सुटाळा खु. ग्रामपंचायत सरपंचपदी निलेश विनायकराव देशमुख तर उपसरपंचपदी जयेश वावगे,शीरजगांव देशमुखच्या सरपंचपदी सौ.सुवर्णा श्रीकृश्ण टिकार, उपसरपंचपदी अलताफ खान वाहब खान, टाकळी ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.मनोरमा जनार्दन पारधी, उपसरपंचपदी वासुदेव अवधुत इंगळे,टेंभुर्ण ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.भारती श्रीकृश्ण मोरे, उपसरपंचपदी सौ.भारती अनंता माळी, उमरा अटाळी ग्रामपंचायत सरपंचपदी धम्मपाल हिवराळे , उपसरपंचपदी गजानन भिसे, वरणा ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.स्वाती उमेश इंगळे,उपसरपंचपदी सौ.सुनिता प्रभाकर इंगळे, वाडी ग्रामपंचायत सरपंचपदी बंटी मिरगे, उपसरपंचपदी विजय बोर्डे, विहिगांव ग्रामपंचायत सरपंचपदी दिलीप षेगांवकर, उपसरपंचपदी सौ.स्वाती ज्ञानेष्वर राउत हे विजयी झाले आहेत.सुजातपुर ग्राम पंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादी आघाडीच्या सौ.प्रभावती रविंद्र धुरंधर, उपसरपंचपदी काॅंग्रेसच्या सौ.मंगला डिगांबर बेलोकार, तर षिराळा ग्राम पंचायतच्या सरपंचपदी राश्टवादी आघाडीच्या सौ.प्रतिभा रविंद्र तायडे व उपसरपंचपदी डाॅ.संतोश विठोबा हटकर हे विजयी झाले आहे.
शेगांव तालुक्यातील माटरगांव बु.च्या ग्रामपंचायत सरपंचपदी काॅंग्रेसच्या सौ.राधा प्रषांत टिकार, उपसरपंचपदी सौ.विद्या प्रदिप शेगोकार, पहुरजिरा ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.सुडोकार, उपसरपंचपदी मनिश सळदकर, वरुड ग्रामपंचायत सरपंचपदी अमोल ज्ञानदेव गोळे, उपसरपंचपदी महेंद्र सखाराम भोजने, तिंत्रव ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.सुविता अमोल भोजने,उपसरपंचपदी सौ.अनिता मुंडाले,मच्छिंद्रखेड ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.रेखा प्रविण भारंबे, उपसरपंचपदी राहुल खंडारे, मोरगांव दिग्रसच्या ग्रामपंचायत सरपंचपदी दिपक नथ्थुजी दामोदर हे विजयी झाले आहे.टाकळी विरो ग्रामपंचायत सरपंचपदी राश्टवादी काॅंग्रेसच्या नंदलाल उन्हाळे, उपसरपंचपदी सौ.स्नेहल मोरे हे विजयी झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here