Home Breaking News तलवारीचा नंगानाच केल्याप्रकरणी न.प.उपाध्यक्ष,नगरसेवकासह सहा जणांना अटक

तलवारीचा नंगानाच केल्याप्रकरणी न.प.उपाध्यक्ष,नगरसेवकासह सहा जणांना अटक

दहा हजारुपयांच्या पाच तलवारी जप्त
मलकापूर:- शहरातील पारपेठ भागात नगरपालिकेचे उपाध्यक्ष हाजी रशिदखाॅ जमादार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात युवकांनी तलवार घेऊन नाचण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने पो. कॉ. शेख आसीफ शेख गफ्फार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डि.बी.पथकाने काल रात्रीच जावेद खान इस्माईल खान वय 21रा.ताजनगर पारपेठ,मो.शोयब मो.अहमद वय 31 रा.ताजनगर पारपेठ या दोघांना अटक करून त्यांच्या घरातुन पाच तलवारी जप्त केल्या होत्या तर आज सकाळी नगरपालिकेचे उपाध्यक्ष हाजी रशिद खा जमादार, नगरसेवक मो. जावेद मो.सलीम कुरेशी वय 40 रा.कुरेशी मोहल्ला,मो.फैजुररहेमान मो.सैफुरहेमान वय 25 रा.पिलुतकीया पारपेठ अश्या एकुण सहा जणांना अटक केली असुन यांच्या कडुन दहा हजार रुपयांच्यापाच तलवारी जप्त केल्या आहे .
त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता दि.15 फेब्रुवारी पर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत ठाकुर करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here