Home Breaking News अखेर १७ व्या दिवशी शेतकऱ्यांच्या उपोषणाशी सांगता

अखेर १७ व्या दिवशी शेतकऱ्यांच्या उपोषणाशी सांगता

न्याय मिळेपर्यंंत प्रकल्पग्रस्तांचा लढा सुरूच राहणार- श्याम अवथळे

खामगाव- तालुक्यातील निमकवळा येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला देण्यासोबतच त्यांच्या विविध मागण्यांचा विचार करून प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना शेतजमिनीचा मोबदला मिळण्यासोबतच विविध मागण्यांसाठी 26 जानेवारीपासून प्रकल्पस्थळी धरणाच्या भिंतीवर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी या उपोषणाला पाठिंबा देत दि.30 जानेवारी पासून स्वतः उपोषण सुरू केले होते. मात्र प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही त्या मुळे आक्रमक आंदोलन करत जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते तर उपोषणाच्या 13 व्या दिवशी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील हे जिल्हा दौर्‍यावर आले असता 7 फेब्रुवारी रोजी रात्री स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री मा.ना.श्री. जयंत पाटील यांची खामगाव येथे भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले होते यावर सोमवारी ना. पाटील यांनी बुलढाणा येथे लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य ती माहिती घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे व दोषी अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्या वर योग्य ती कार्यवाही करून अहवाल जलसंपदा खात्याकडे पाठवावा असे आदेश दिले होते त्या नंतर अन्न व औषध प्रशासन ज जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. राजेंद्र शिंगणे आहे आणि स्वाभिमानीचे राज्याचे नेते श्री. रविकांत तुपकर यांनी 2 दिवस उपजिल्हाधिकारी गीते यांच्या सोबत तसेच लघु पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनसोबत चर्चा करत आज दि 11 फेब्रुवारी रोजी लघु पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुपेकर साहेब,संत साहेब,मेतकर साहेब, उपविभागीय अधिकारी जाधव साहेब तहसीलदार रसाळ साहेब यांच्या उपस्थितीत या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता झाली असून सर्व मागण्याची पूर्तता करण्याचे व लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुभाष पाटील यांची चौकशी करून त्यांना कारणे दाखवा व दोषारोप पत्र देऊन व इतर कृषी विभागाचे अधिकारी यांची वारिष्टमार्फत चौकशी करून योग्य ती कडक कार्यवाही करून शेतकऱ्याच्या सर्व मागण्या पूर्ण करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.तरी तात्काळ मागण्याची पूर्तता करण्यात यावी व शेतकऱयाला न्याय दयावा अन्यथा पुन्हा शेतकऱ्याचा रोषाला सामोरे जावे लागेल आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा लढा हा न्यायमिळेपर्यंत सुरूच राहणार असा इशारा श्याम अवथळे यांनी दिला.
तर या वेळेस काळेगाव,रोहना,निमकवळा व दिवठाणा या गावातील महेंद्रसिंग राठोड,सुरेंद्र राठोड,रवींद्र राठोड,प्रल्हाद वाघमारे, प्रमोद निमकर्डे,रामेश्वर मुंडे, प्रकाश धोटे,वसंत अमलकार,परमेश्वर राठोड ,श्रीकृष्ण देवकर, वामन मानकर, न्यानदेव मोरखडे, श्रीराम मुंडे, नारायण वाफधाने, शालिग्राम वाघमारे, न्यानेश्वर सातव,न्यानदेव राठोड या उपोषणकर्त्या सोबत इतर शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here