Home Breaking News पर्यटकांचा बोटींगला भरभरून प्रतिसाद

पर्यटकांचा बोटींगला भरभरून प्रतिसाद

बुलडाणा जिल्ह्यातीलपलढग धरणातील बोटींगचा आनंद

बुलडाणा, (जिमाका) : जिल्ह्यातील वैभव असलेल्या व विविध वृक्षप्रजाती, वन्यजीव, डोंगरदऱ्या, तलाव आदी बाबींसह विपुल नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याच्या पायथ्याशी पलढग धरण आहे. या धरणात बोटींगची सुविधा असून पर्यटकांचा बोटींगला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.  येथे सध्या दोन बोटींगची सुविधा आहे. ज्ञानगंगा जंगल सफारीसाठी चिंच फाटा व गोंधनखेड गेट जवळ जिप्सी बुकींग सेंटर सुरू करण्यात आले आहे. आता जंगल सफाररी बरोबरच पर्यटकांना बोटींचा आनंद घेता येणार आहे. दोन्ही बोटी अतिशय उच्च तंत्रज्ञानाने तयार केलेल्या असून सर्व सुविधांनी सुसज्ज आहेत. प्रशिक्षीत चालक बोटी चालवित आहेत. तसेच लाईफ सेव्हींग जॅकेटची सुविधाही येथे उपलब्ध आहे. तरी पर्यटकांनी या बोटींचा, जंगल सफारीसाठी जिप्सीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक व्ही. जी साबळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here