Home प्रेरणदायी ग्राम पंचायतीवर काॅंग्रेस महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

ग्राम पंचायतीवर काॅंग्रेस महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

सरपंच व उपसरपंचाचा मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदांच्या हस्ते सत्कार
खामगांव:- खामगांव तालुक्यातील 71 ग्राम पंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झालेला असून दि.10 फेब्रुवारी 2021 रोजी  खामगांव तालुक्यातील 24 ग्राम पंचायतीच्या सरपंच,उपसरपंच पदाकरीता निवडणुक पार पडली. महाविकास आघाडीचाच  बोलबाला कायम राहिला असुन काॅंग्रेस महाविकास आघाडीने 24 पैकी 18 जागेवर विजय मिळवून निर्वीवाद वर्चस्व सिध्द केले आहे.भारिप बहुजन महासंघाला  2, स्थानिक विकास आघाडीला 3  तर भाजपाला केवळ एकच जागा मिळाली आहे. तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत समजली जाणाÚया पिंपळगांव राजा,लाखनवाडा यासारख्या अनेक मोठया ग्राम पंचायतीमध्ये काॅंग्रेस महाविकास आघाडीचे सरपंच, उपसरपंच विराजमान झाले आहे. यावरुन ग्रामपंचायत निवडणूकीत यत्र-तत्र-सर्वत्र काॅंग्रेस प्रणित महाविकास आघाडीचाच बोलबाला राहिला असून  आहे.

बुधवार दि.10 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या सरपंच,उपसरपंच पदाच्या निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. यामध्ये 10 ग्राम पंचायती हया अविरोध निवडूण आल्या.यामध्ये जनुना येथुन काॅंग्रेसच्या सौ.सुवर्णा संदिप गोरे हया सरपंच तर ज्ञानदेव प्रल्हाद डवंगे उपसरपंच, कदमापूर येथे काॅंग्रेसच्या रोहिणी पवन पवार हया सरपंच तर उपसरपंच म्हणून भारिपच्या सुजाता अक्षय इंगळे, कंझारा येथे सरपंच म्हणून काॅंग्रेसच्या सौ.फरजाना परवीन षफी उल्ला खा तर उपसरपंच म्हणून सौ.निर्मला गौतम लांडगे, लाखनवाडा बु. येथे काॅंग्रेसचे शेख अफरोज शेख युसुफ तर उपसरपंच म्हणून भारिपचे प्रकाश नारायण इंगळे, लाखनवाडा खुर्द चे सरपंच म्हणून काॅंग्रेसचे अरशद बेग तर उपसरपंच म्हणुन भारिपचे प्रविण बाबुराव वानखडे, मांडका येथे सरपंच म्हणून काॅंग्रेसचे रमेश खंडारे तर उपसरपंच म्हणून भारिपच्या सौ.कविता वानखडे, पळषी खुर्दचे सरपंच म्हणून काॅंग्रेसचे संजय नामदेव धनोकार, उपसरपंच म्हणून रामभाउ संपत वानखडे, पातोंडयांच्या सरपंचपदी काॅंग्रेसच्या सौ.पुश्पा अनिल जाधव तर उपसरपंचपदी लक्ष्मी विलास मोरखेडे,हिंगणा कारेगांव येथे सरपंचपदी काॅंग्रेस सौ.राजकुमारी चव्हाण तर उपसरपंच म्हणून भारिपचे हिंम्मत यषवंत जाधव हे विजयी झाले आहे.पारखेड  ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून काॅंग्रेस महाविकास आघाडीतील सेेनेच्या सौ.संगिता हिम्मत सरदार हया तर उपसरपंच म्हणून काॅंग्रेसचे प्रतापसिंग सुरेष राठोड हे विजयी झाले आहे.
काळेगांवच्या सरपंचपदी काॅंग्रेसच्या सौ.वंदना विलास इंगळे तर उपसरपंचपदी विजय भिमराव खंडारे,कुंबेफळ येथे सरपंचपदी काॅंग्रेसचे संतोश लक्ष्मण डवंगे तर उपसरपंचपदी सौ.निर्मला भास्कर इंगळे,कोलोरी सरपंचपदी काॅंग्रेसचे निलेश विक्रम टिकार तर उपसरपंचपदी विकास षिवराम गुडदे,लांजुळ सरपंचपदी काॅंग्रेसच्या सौ.उशाबाई विठठ्ल थेरोकार,तर उपसरपंचपदी राम गणपत अंभोरे, निपाणा सरपंचपदी काॅंग्रेसचे नारायण यषवंत गावंडे, उपसरपंचपदी गजानन रामकृश्ण भटकर, पाळा सरपंचपदी काॅंग्रेसच्या सौ.सविता संतोश खटके तर उपसरपंचपदी अर्चना अनंता चांदणे,पिंपळगांव राजा सरपंचपदी  काॅंग्रेसचे शेख शाकीर शेख चाॅंद, उपसरपंचपदी सौ.सुनिता वसंत तेलंग हे विजयी झाले आहे. कचंनपूर,कारेगांव बु. या दोन ग्राम पंचायतीत भारिपचा विजय झाला असून जळका भडंग,कौलखेड,निमकवळा या ग्राम पंचायतीमध्ये स्थानिक विकास आघाडीची सत्ता आली असून निरोड ही एकमेव ग्राम पंचायत भाजपला जिंकता आली आहे.
नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचा जनसंपर्क कार्यालय येथे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला व पेढा भरवुन त्यांचे तोंड गोड करण्यात आले.  यावेळी बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये खामगांव मतदार संघातील जनतेने काॅंग्रेस महाविकास आघाडीवर विष्वास दाखविल्यामुळे सर्वाधिक जागेवर काॅंग्रेस महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्यांनी आपसात समन्वय ठेउन आपले गांव स्वच्छ,सुंदर व समस्यामुक्त करुन आदर्ष गांव बनविण्यासाठी प्रयत्नांची पराकाश्ठा करावी, गाव विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, एकसंघ राहा असे आवाहन  त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here