Home Breaking News हिंगणा का. ग्रामपंचायतच्या सरपंच पदी दुसऱ्यांदा  सौ. राजकुमारी चौहान अविरोध निवड

हिंगणा का. ग्रामपंचायतच्या सरपंच पदी दुसऱ्यांदा  सौ. राजकुमारी चौहान अविरोध निवड

उपसरपंच पदी हिम्मत जाधव यांची अविरोध 
खामगाव :- खामगाव तालुक्यातील बहुचर्चित ग्रामपंचायत हिंगणा कारेगाव ग्रामपंचायत मध्ये सौ. राजकुमारी चौहान ह्या अविरोध सरपंच निवडून आल्या असून दुसऱ्यांदा त्या सरपंच पदाचा प्रभार घेणार आहेत.
ग्रामपंचायत हिंगणा कारेगाव येथील या वेळेला जी निवडणूक झाली ती अगदी सुरवाती पासूनच अत्यन्त खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायत मध्ये सरपंच आणि उपसरपंच सर्वानुमते अविरोध ठरविण्यात आले. यामध्ये नवनिर्वाचित सदस्य म्हणून सौ. राजकुमारी ताई तेजेंद्रसिंह चौहान यांनी पदभार स्वीकारला तर उपसरपंच पदी हिंमत जाधव यांनी पदभार स्वीकारला. या वेळी माजी सरपंच श्री तेजेंद्र सिंह चौहान, पोलीस पाटील, वरिष्ठ गावकरी मंडळी, अधिकारी वर्ग यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच आणि सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्यात. आणि छोटेखानी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात सर्वांचा सत्कार ही पार पडला, यावेळी नवनिर्वाचित सरपंच सौ. राजकुमारी चौहान यांनी प्रतिपादन केले की, आम्ही नऊ ही सदस्य ग्रामविकासचा ध्यास घेऊन ग्रामन्नती साधण्याचा सर्वानुमते प्रयत्न करू, नवीन विचारांना  आत्मसात करू, सर्वसमावेशकता, जाती पतीचे राजकारण टाळू आणि गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी बांधील असु असा मनोदय नवनिर्वाचित सरपंच सौ राजकुमारीताई चौहान यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचलन आणि आभार तेजेंद्रसिंहं चौहान यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील ईश्वरसिंग चव्हाण, राजेश्वर चव्हाण, शिवाजीराव चव्हाण, उमरावसिंग चव्हाण, पुरुषोत्तम फुंडकर, विजयसिंग चव्हाण, अशोक चव्हाण, राजू चव्हाण, सुभाष चव्हाण, शेषराव चव्हाण, मधुकर दहीभात, मनोहर जाधव, प्रकाश जाधव, सुभाष जाधव, किरण सिंग चव्हाण, अशोक चव्हाण, पुरुषोत्तम दहीभात, राजेन्द्र तोंडे, महेंद्रसिंह चव्हाण, गोपाळ पानझाडे, साहिल देशमुख, कृष्णा जाधव, अनिल जाधव, देविदास अंजसंडे, पंजाबराव पानझाडे, लक्ष्मण रोहनकार, बाळू रोहनकार, संदीप पाटील, संतोष चव्हाण आदी मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here