Home Breaking News हा मुलगा हरवला आहे, दिसल्यास पोलिसांना कळवा

हा मुलगा हरवला आहे, दिसल्यास पोलिसांना कळवा

मलकापूर:- शहरालगत असलेल्या ग्राम वाकोडी येथील ऋषिकेश जनार्धन काजळे वय 20 हा तुलसी नगर मधील मुन्ना आसटकर यांच्या ट्रॅक्टर वर चालक असुन दि. 30 जानेवारी 2021रोज शनिवार रोजी घरुन सकाळी कामावर गेला मात्र सायंकाळी घरी आला नाही याबाबतची फिर्याद त्याचे वडील रामधन काजळे वय 50 याने शहर पो.स्टे दिली असून शहर पोलीसांनी मिसिंगची नोंद घेतली आहे, ऋषीकेश याची उंची 5 फुट,रंग गोरा,बांधा सड पातळ,केस काळे, कपडे- अंगामध्ये लाल निळे टी शर्ट काळा जिन्सपॅन्ट,पायात सॅन्डल,बोली भाषा मराठी, खांद्यावर जुने जखमेचे व्रण अशा वर्णनाचा युवक आढळून आल्यास मलकापुर शहर पोलिस स्टेशन शी संपर्क साधण्याचे आवाहन पो.काॅ सचिन पाटील यांनी केले आहे.