Home राजकारण सेल्फी तो बहाणा था; शिंगणे व जाधव एका फ्रेममध्ये !

सेल्फी तो बहाणा था; शिंगणे व जाधव एका फ्रेममध्ये !

सरोवर अन् सेल्फी… चर्चा तर होणारच….

बुलडाणा… राजकारणामध्ये फार काळ कुणी कुणाचा मित्र अथवा शत्रू राहू शकत नाही हे अनेक वेळा उदाहरणासह स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे काल सरोवर पाहणीसाठी लोणारात आले आणि त्यांना सरोवराचा फोटो मोबाईल कैद करण्याचा मोह आवरता आला नाही. याच वेळी राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांचाही सेल्फी खासकरून चर्चेचा विषय राहिला. यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पालकमंत्री शिंगणे यांना सेल्फी कसा काढावा हे शिकवले.
बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारण, सहकारावर ना. राजेंद्र शिंगणे अन् खासदार प्रतापराव जाधव या दोघांचे वरचस्वा राहिल आहे. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही नेते राजकारणाचे जोडे बाहेर काढून एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं. लोकसभा निवडणुकीपासून या दोघांमध्ये राजकीय दुरावा वाढला. खासकरून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर यात आणखी वाढ झाली. महाविकास आघाडीचे सत्ता समीकरण जुळले असले तरी हा दुरावा अनेक वेळा समोर आला आहे. उघडपणे नसले तरी कार्यकर्त्यांच्या क्रिया – प्रतिक्रिया आणि तक्रारींचे राजकारण जोमात आहे. एवढेच काय तर शिवसेनेची बुलडाणा जिल्ह्यातील मंत्री पदाची संधी हुकली. डॉक्टर शिंगणे यांना पवार निष्ठेमुळे कॅबिनेट मंत्री पद मिळाले आणि त्यांच्या शपथविधीला देखील जाण्याचे शिवसेना खासदार जाधव यांनी टाळले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सव्वा लाखा हून अधिक मतांनी खासदार जाधव यांनी शिंगणे पराभव केला. लोकसभेतील पराभवानंतर सिंदखेडराजा येथून विधानसभा लढलेले शिंगणे जिंकले आणि थेट कॅबिनेट मंत्री झाले. सोबतच बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पद सुध्दा त्यांचेकडे आले.( अर्थात पहाटे पाचचा शपथ विधी अन् नाट्यमय घडामोडी याचेही शिंगणे याची देही याची डोळा साक्षीदार होते)
महाविकास आघाडीला एक वर्ष झाले. मात्र शिंगणे अन् जाधव यांच्यातील टयूनिंग फार जमले असे दिसले नाही. या वातावरणात लोणार येथे सरोवर पाहणी प्रसंगी पालकमंत्री ना.राजेंद्र शिंगणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खा.जाधव यांच्या सोबत सेल्फी घेतला. मुख्य मंत्र्या पेक्षा खा.जाधव यांचेसोबत तो अधिक जवळचा वाटला.
लोणार सरोवर हे खाऱ्या आणि गोड पाण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. राजकारणात ही सेल्फी मैत्री रुपाने गोड होते का हे आगामी काळात दिसणारच आहे. त्यामुळेच सरोवर अन् सेल्फी चर्चा तर होणारच!