Home आरोग्य अग्रवाल हॉस्पीटल खामगांव येथे एकाच वेळी दोन्ही गुडघा बदलीची यशस्वी शस्त्रक्रिया

अग्रवाल हॉस्पीटल खामगांव येथे एकाच वेळी दोन्ही गुडघा बदलीची यशस्वी शस्त्रक्रिया

खामगांव- स्थानिक सुप्रसिध्द अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश अग्रवाल यांचे अग्रवाल हॉस्पीटल, नांदुरा रोड येथे नुकतेच गुडघा बदलीची जटील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
खामगांव येथील ७२ वर्षीय महिला श्रीमती शर्मा यांना अनेक वर्षापासुन गुडघे दुखीचा त्रास होता. हळुहळु तो त्रास त्यांना असहनीय होऊन त्यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासून एकाच बाजुला तिरपे झाले होते. त्यावर त्यांनी अनेक इलाज करुनही त्यांना चालतांना अत्यंत वेदना व त्रास होत होता. या त्रासाला कंटाळून शेवटी त्यांनी डॉ. नितीश अग्रवाल जवळ दोन्ही पायांची संपुर्ण तपासणी केली असता दोन्ही गुडघे बदली शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. त्यानुसार त्यांच्या दोन्ही गुडघ्यावर गुडघे बदली शस्त्रक्रिया करुन तिरपे झालेले पाय सुध्दा सरळ झाले.
रुग्णाला शस्त्रक्रियेच्या दुसर्याच दिवशी दोन्ही पायावर सरळ उभे करण्यात आले असुन तिसर्या दिवशी चालविण्यात आले. तसेच पाचव्या दिवशी सुखरुप सुटी देण्यात आली.
या शस्त्रक्रियेमध्ये अत्याधुनीक तंत्रज्ञान आणि उच्च प्रतीचे विदेशी सांधे वापरण्यात आले.
खामगांव शहरातच एवढी मोठी यशस्वी शस्त्रक्रिया कमी खर्चात आणि कमी त्रासात झाल्याबद्दल रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईकांनी समाधान व आनंद व्यक्त करुन डॉ. नितीश अग्रवाल यांचे आभार मानले.